Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > शेव्हिंग केल्याने खरंच महिलांच्याही चेहऱ्यावर जाड आणि जास्त केस येतात? डॉक्टर सांगतात, खरं काय..

शेव्हिंग केल्याने खरंच महिलांच्याही चेहऱ्यावर जाड आणि जास्त केस येतात? डॉक्टर सांगतात, खरं काय..

Women Face Shaving : अनेक महिला किंवा तरूणी या भीतीमुळे फेस शेव्हिंग करण्यास घाबरतात आणि मग वॅक्सिंग किंवा थ्रेडिंगच्या वेदना सहन करतात. पण यात तथ्य आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:39 IST2026-04-06T10:51:42+5:302026-04-06T14:39:52+5:30

Women Face Shaving : अनेक महिला किंवा तरूणी या भीतीमुळे फेस शेव्हिंग करण्यास घाबरतात आणि मग वॅक्सिंग किंवा थ्रेडिंगच्या वेदना सहन करतात. पण यात तथ्य आहे का?

Does face shaving cause coarser and thicker facial hair in women? know what dermatologist says | शेव्हिंग केल्याने खरंच महिलांच्याही चेहऱ्यावर जाड आणि जास्त केस येतात? डॉक्टर सांगतात, खरं काय..

शेव्हिंग केल्याने खरंच महिलांच्याही चेहऱ्यावर जाड आणि जास्त केस येतात? डॉक्टर सांगतात, खरं काय..

Women Face Shaving : महिलांच्या मनात फेस शेव्हिंगबाबत हीच भीती असते की, याने केस पुरूषांसारखे जाड, जास्त आणि काळे येऊ लागतील का? अनेक महिला किंवा तरूणी या भीतीमुळे फेस शेव्हिंग करण्यास घाबरतात आणि मग वॅक्सिंग किंवा थ्रेडिंगच्या वेदना सहन करतात. पण डर्मेटोलॉजिस्ट डॉ. गुरवीन वराइच यांनी हा एक मोठा गैरसमज असल्याचं सांगितलं. चला जाणून घेऊ याबाबत डॉक्टरांचं काय मत आहे. 

शेव्हिंगने केस जाड आणि डार्क होतात का?

या प्रश्नाचं सरळ आणि वैज्ञानिक उत्तर नाही असं आहे. चेहऱ्यावरील केस शेव्ह केल्याने ते जाड होत नाहीत, त्यांचा रंग बदलत नाही आणि त्यांची संख्याही वाढत नाही. आपल्या केसांची बनावट आणि विकास आपल्या शरीराच्या हार्मोन्स व जेनेटिक्सवर अवलंबून असते. ते आपण कसे कापतो यावर नाही.

मग भीती कशाची वाटते?

मुळात जेव्हा आपण शेव्ह करतो तेव्हा रेजरने केस तिरपे कापले जातात. जेव्हा तेच केस पुन्हा वाढतात तेव्हा त्यांचं टोक ब्लंट असतं, ज्याला स्पर्श केल्यावर ते थोडे कठोर वाटतात. पण जेव्हा केस पूर्ण वाढतात, तेव्हा आधीसारखे मुलायम होतात. शेव्हिंगच्या केसाच्या मूळावर काहीच प्रभाव होत नाही. त्यामुळे केसाच्या नॅचरल विकासामध्ये कोणताही बदल होत नाही.


फेस शेव्हिंगची योग्य पद्धत?

थेट कोरड्या त्वचेवर रेज फिरवू नका. आधी चेहरा एका माइल्ड क्लींजरने धुवा. जेणेकरून धूळ आणि तेल साफ होईल.

शेव्हिंग स्मूद होण्यासाठी चेहऱ्यावर अॅलोव्हेरा जेल, फेशिअम ऑइल किंवा कोणतंही हलकं मॉइश्चरायजर लावा. याने रेजर सहजपणे घसरेल आणि कापण्याचा किंवा जळजळ होण्याचा धोका कमी होतो. कधीही ड्राय शेव्ह करू नये. 

साधारण बॉडी रेजरऐवजी फेस शेव्हिंगसाठी बनवलेले सिंगल ब्लेड रेजरचा वापर करा. यांचं ब्लेड छोटं असतं. जे चेहऱ्याच्या नाजूक भागांसाठी सुरक्षित असतं.   

आपला त्वचा एका हाताने वरच्या बाजूने खेचून टाइट करा. रेजर ४५ डिग्रीच्या कोनात पकडा आणि छोटे छोटे स्ट्रोक घ्या. नेहमीच केस उगवण्याच्या दिशेनेच रेजर चालवा.

शेव्हिंग केल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. त्यानंतर एक चांगलं मॉइश्चरायजर लावा आणि कोणत्याही प्रकारचं AHA किंवा BHA चा वापर करणं टाळा. सोबतच उन्हातून निघण्याआधी सनस्क्रीन आवर्जून लावा. जर आपल्या चेहऱ्यावर अॅक्टिव अॅक्ने किंवा जर एखादं इन्फेक्शन असेल तर शेव्हिंग करणं टाळा.

Web Title : क्या शेविंग से महिलाओं के चेहरे पर बाल मोटे होते हैं?

Web Summary : शेविंग से चेहरे के बाल मोटे नहीं होते, यह मिथक है। बालों की बनावट हार्मोन और जेनेटिक्स पर निर्भर करती है, काटने पर नहीं। सफाई के बाद शेव करें, एलोवेरा का उपयोग करें, और नाजुक क्षेत्रों के लिए फेस रेजर का उपयोग करें। शेविंग के बाद हमेशा मॉइस्चराइजर और सनस्क्रीन लगाएं।

Web Title : Does shaving cause thicker hair growth on women's faces?

Web Summary : Shaving doesn't make facial hair thicker or darker; it's a myth. Hair texture depends on hormones and genetics, not cutting. Shave after cleansing, use aloe vera, and a face razor for delicate areas. Always moisturize and apply sunscreen after shaving.