Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > तुमच्या डोक्यात ओला कोंडा झाला आहे की कोरडा? चुकीचे उपाय करुन वाढतो त्रास, पाहा कोंड्याचा प्रकार

तुमच्या डोक्यात ओला कोंडा झाला आहे की कोरडा? चुकीचे उपाय करुन वाढतो त्रास, पाहा कोंड्याचा प्रकार

Do you have wet dandruff or dry one? using the wrong products can increase the problem, see how to identify : केसांची काळजी घ्या. कोंडा झाला असेल तर पाहा कसा ओळखावा त्याचा प्रकार.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2026 14:02 IST2026-01-02T14:01:51+5:302026-01-02T14:02:57+5:30

Do you have wet dandruff or dry one? using the wrong products can increase the problem, see how to identify : केसांची काळजी घ्या. कोंडा झाला असेल तर पाहा कसा ओळखावा त्याचा प्रकार.

Do you have wet dandruff or dry one? using the wrong products can increase the problem, see how to identify | तुमच्या डोक्यात ओला कोंडा झाला आहे की कोरडा? चुकीचे उपाय करुन वाढतो त्रास, पाहा कोंड्याचा प्रकार

तुमच्या डोक्यात ओला कोंडा झाला आहे की कोरडा? चुकीचे उपाय करुन वाढतो त्रास, पाहा कोंड्याचा प्रकार

कोंडा ही केसांची आणि टाळूची एक सामान्य आहे. कोंड्यातही प्रकार असतात. कोरडा कोंडा आणि ओला (तेलकट) कोंडा. या दोन्ही प्रकारांची कारणे, लक्षणे आणि उपाय वेगवेगळे असतात. त्यामुळे नेमका कोणता कोंडा आहे हे ओळखून त्यावर उपाय केले, तर समस्या लवकर आटोक्यात येऊ शकते.

कोरडा कोंडा प्रामुख्याने टाळू खूप कोरडी झाल्यामुळे निर्माण होतो. थंड किंवा कोरडे हवामान, सतत गरम पाण्याने केस धुणे, जास्त केमिकलयुक्त किंवा खूप शाम्पू वापरणे, तसेच शरीरात पाण्याची कमतरता असणे ही त्यामागची मुख्य कारणे आहेत. (Do you have wet dandruff or dry one? using the wrong products can increase the problem, see how to identify )अशा वेळी टाळूवरील त्वचेच्या पेशी सुकून लहान, पांढर्‍या भुरभुरीत कणांच्या स्वरुपात गळू लागतात. हा कोंडा हलका असतो, केसांवर किंवा खांद्यावर सहज दिसतो आणि अनेकदा खाज येते, पण टाळू फारसा तेलकट नसतो.

ओला कोंडा मात्र टाळूवर जास्त तेल स्रवल्यामुळे होतो. टाळू तेलकट झाल्यावर त्यावर बुरशी वाढण्यास पोषक वातावरण तयार होते. त्यामुळे कोंडा मोठ्या, चिकट, पिवळसर किंवा पांढऱ्या थरांच्या स्वरुपात दिसतो. हा कोंडा टाळूला घट्ट चिकटलेला असतो, खाज जास्त असते आणि कधी कधी टाळू लाल होणे, जळजळ होणे किंवा दुर्गंधी येणे अशी लक्षणेही दिसतात. ओल्या कोंड्याकडे वेळेवर लक्ष दिले नाही, तर केसगळती वाढण्याची शक्यता असते.

कोरडा कोंडा कमी करण्यासाठी टाळूला योग्य ओलावा आणि पोषण देणे गरजेचे असते. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कोमट तेलाने टाळूची हलक्या हाताने मालीश करावी. खोबरेल तेल, बदाम तेल किंवा थोडेसे एरंडेल तेल यांचा वापर फायदेशीर ठरतो. केस धुताना फार गरम पाणी टाळावे आणि सौम्य, सल्फेट-फ्री शाम्पू वापरावा. पुरेसे पाणी पिणे, फळे, हिरव्या भाज्या आणि चांगल्या फॅट्सचा आहारात समावेश केल्यास टाळू आतूनही निरोगी राहतो.

ओल्या कोंड्यासाठी टाळू स्वच्छ ठेवणे आणि अतिरिक्त तेल नियंत्रणात ठेवणे अधिक महत्त्वाचे असते. अति प्रमाणात किंवा वारंवार तेल लावणे टाळावे. केस नियमित धुवावेत. कडुलिंब, टी ट्री ऑइल, झिंक किंवा इतर अँटी-डँड्रफ घटक असलेले शाम्पू उपयोगी ठरतात. केस धुतल्यानंतर टाळू नीट कोरडा करावा. घाम साचू देऊ नये आणि सतत घट्ट टोपी किंवा हेल्मेट घालणे टाळावे. कोंड्यामुळे केस गळतात. त्वचाही खराब होते , त्यामुळे काळजी घेणे फार गरजेचे असते. 

Web Title : रूसी: सूखा या तैलीय? पहचानें और सही उपचार करें।

Web Summary : रूसी के प्रकार हैं: सूखा और तैलीय, दोनों को अलग उपचार की आवश्यकता है। सूखा रूसी सूखापन के कारण होता है; तैलीय, अतिरिक्त तेल से। सही उपचार बालों का झड़ना रोकता है।

Web Title : Dry or oily dandruff? Know the type and treat accordingly.

Web Summary : Dandruff has types: dry and oily, each needs tailored treatment. Dry dandruff is due to dryness; oily, excess oil. Correct treatment prevents hair fall.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.