आंघोळ करताना दररोज साबण लावण्याची अनेकांना सवय असते कारण त्वचेवर साबण लावल्याने शरीर स्वच्छ होतं असं त्यांना वाटत असतं. पण ही सवय शरीरासाठी घातक आहे. दररोज साबण लावल्याने त्वचेतील ओलावा निघून जाऊ शकतो आणि ती कोरडी होऊ शकते. म्हणूनच त्वचेची नीट काळजी घेण्यासाठी साबण कधी आणि किती वेळा वापरावा हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
दररोज साबण का लावू नये?
दररोज शरीरावर साबण लावणं योग्य नाही. शरीर स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे, परंतु त्वचेवर दररोज साबण लावल्याने तुमच्या त्वचेतील नॅचरल ऑईल कमी होतं, म्हणजेच जर तुम्ही दररोज साबण वापरलात तर तुमची त्वचा कोरडी आणि निर्जीव होऊ शकते. तसेच जर तुम्हाला दररोज साबण वापरायचा असेल, तर तुम्ही केमिकल बेस्ड साबणाऐवजी नॅचरल साबण वापरू शकता.
किती दिवस वापरावा साबण?
जर तुमची त्वचा सेन्सेटिव्ह असेल तर तुम्ही दररोज साबण वापरू नका. आठवड्यातून तीन ते चार वेळा साबण वापरणे योग्य आहे. आठवड्यातून नेमका किती वेळा साबण वापरावा याबद्दल तज्ज्ञांचं वेगवेगळं मत आहे.
हे ठेवा लक्षात
जर तुम्ही आठवड्यातून २-३ दिवस साबण वापरला तर त्यामुळे कोरडेपणाची समस्या उद्भवत नाही. ज्या दिवशी तुम्ही साबण वापरता त्या दिवशी थंड पाण्याने आंघोळ करण्याचा प्रयत्न करा. गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेची आर्द्रता आणखी कमी होऊ शकते. तुम्हाला हवं असल्यास थोड्या थंड पाण्याने आंघोळ करा, यामुळे कोरडेपणाची समस्या कमी होऊ शकते. परंतु लक्षात ठेवा की ज्या दिवशी तुम्ही साबण वापरत नाही त्या दिवशी आंघोळ करायला विसरू नका. शरीराच्या स्वच्छतेसाठी दररोज आंघोळ करणं खूप महत्त्वाचं आहे.