Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > थकवा, ताण आणि त्वचेच्या समस्यांवर उपाय, मिठाच्या पाण्यानं करा आंघोळ; मिळतील इतरही फायदे

थकवा, ताण आणि त्वचेच्या समस्यांवर उपाय, मिठाच्या पाण्यानं करा आंघोळ; मिळतील इतरही फायदे

Salt Water Bath Benefits : आपल्याला नक्कीच प्रश्न पडला असेल की, हे खारट मीठ त्वचेवर कसं लावायचं? तर हेच आज आपण पाहणार आहोत. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 16:10 IST2025-10-10T16:06:38+5:302025-10-10T16:10:56+5:30

Salt Water Bath Benefits : आपल्याला नक्कीच प्रश्न पडला असेल की, हे खारट मीठ त्वचेवर कसं लावायचं? तर हेच आज आपण पाहणार आहोत. 

Different and healthy benefits of taking bath with salt water | थकवा, ताण आणि त्वचेच्या समस्यांवर उपाय, मिठाच्या पाण्यानं करा आंघोळ; मिळतील इतरही फायदे

थकवा, ताण आणि त्वचेच्या समस्यांवर उपाय, मिठाच्या पाण्यानं करा आंघोळ; मिळतील इतरही फायदे

Salt Water Bath Benefits : मीठ आणि जेवणाचं नातं अतुट असं आहे. म्हणजे मिठाशिवाय जेवणाची आपण कुणीच कल्पनाही करू शकत नाही. इतकंच नाही तर एखाद्या दिवशी भाजी मीठ कमी जरी झालं तर जेवणाचा मूड जातो. पण मीठ हे केवळ जेवणापुरतंच मर्यादित नसतं. मिठाने जेवणाला चव येतेच, पण आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. अनेकांना तर हे हेही माहीत नसतं की, मीठ त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर असतं. आता आपल्याला नक्कीच प्रश्न पडला असेल की, हे खारट मीठ त्वचेवर कसं लावायचं? तर हेच आज आपण पाहणार आहोत. 

मिठातील त्वचेसाठी फायदेशीर

मिठात आढळणाऱ्या मॅग्नेशिअम, सोडियम आणि कॅल्शिअमसारख्या मिनरल्सने शरीराला होणाऱ्या इन्फेक्शनपासून बचाव केला जाऊ शकतो. मिठाच्या पाण्यात असलेल्या तत्वांमुळे फंगल इन्फेक्शन वाढणं बंद होतं. मिठाचं पाणी त्वचेच्या निर्जीव पेशींना दूर करण्यास मदत करतं. रोज या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा मुलायम आणि चमकदार दिसेल. तसेच याने रंग उजळण्यासही मदत होईल. 

केसांसाठी फायदेशीर

मिठाच्या पाण्याने जर अधून मधून आंघोळ केली ना तर शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत मिळते.  केसांमधील बॅक्टेरिया नष्ट होण्यासोबतच याने डॅंड्रफही दूर होतो. केसांना नवी चमक मिळते. 

इन्फेक्शनपासून बचाव

मिठाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, सोडियमसारखे मिनरल्स असतात. हे त्वचेच्या छिद्रांमध्ये जाऊन स्वच्छता करतात. याने स्किन इन्फेक्शन होण्याचाही धोका कमी होतो. 

चांगली झोप येईल

मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याल थकवा आणि तणाव दूर होतो. याने डोक्याला शांतता मिळते आणि रात्री चांगली झोपही लागते. 

हाडं आणि मांसपेशींना आराम

मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने हाडांमध्ये होणाऱ्या वेदनांपासून बचाव होतो. तसेच याने ऑस्टियोऑर्थरायटिस आणि टेंडीनीटिससारख्या समस्याही दूर होतात. 
 

Web Title : नमक के पानी से स्नान: थकान, तनाव और त्वचा की समस्याओं का उपाय

Web Summary : नमक के पानी से स्नान कई लाभ प्रदान करता है। नमक में मौजूद खनिज संक्रमण से लड़ने, त्वचा को एक्सफोलिएट करने और नींद में सुधार करने में मदद करते हैं। यह मांसपेशियों के दर्द से राहत और रूसी को कम कर सकता है, जिससे समग्र कल्याण और स्वस्थ त्वचा को बढ़ावा मिलता है।

Web Title : Salt Water Bath: Remedy for Fatigue, Stress, and Skin Problems

Web Summary : Salt water baths offer multiple benefits. Minerals in salt help fight infections, exfoliate skin, and improve sleep. It can relieve muscle pain and reduce dandruff, promoting overall well-being and healthy skin.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.