Face Wash Tips : त्वचेची काळजी घेण्यासाठी फेस वॉश वापरणं एक सोपा आणि कॉमन उपाय आहे. अलिकडे महिला असोत वा पुरूष याचा वापर करू लागले आहेत. याने चेहऱ्यावरील धूळ, मेकअप आणि प्रदूषणाचे कण तर साफ होतातच, सोबतच त्वचा फ्रेश आणि निरोगी राहते. पण जर आपण रॅंडम कोणताही फेस वॉश वापरला तर त्वचेचं नुकसानही होऊ शकतं. त्यामुळे फेस वॉश खरेदी करताना काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून योग्य फेस वॉश निवडता येईल.
आपला स्किन टाइप ओळखा
फेस वॉशची निवड करताना सर्वात आधी आपली त्वचा नॉर्मल, ऑयली, ड्राय, सेंसिटिव्ह किंवा कॉम्बिनेशन आहे हे समजून घ्या. ऑयली स्किनसाठी ऑइल-कंट्रोल फेस वॉश योग्य ठरतो. यात सॅलिसिलिक अॅसिड किंवा टी ट्री ऑइलसारखे घटक असावेत. ड्राय स्किनसाठी मॉइश्चरायझिंग किंवा क्रीम-बेस्ड फेस वॉश चांगला असतो. यात ग्लिसरीन, हायाल्युरोनिक अॅसिड किंवा शिया बटर असावे. सेंसिटिव्ह स्किनसाठी सौम्य, फ्रेगरन्स-फ्री आणि जेंटल फॉर्म्युला असलेला फेस वॉश निवडा.
काय काय तत्व आहेत तपासा
फेस वॉश घेण्यापूर्वी त्यावरील घटक नीट वाचा. सल्फेट्स, पॅराबेन्स आणि आर्टिफिशियल फ्रेगरन्स यांसारख्या घातक केमिकल्सपासून दूर राहा, कारण ते त्वचेवर जळजळ, कोरडेपणा आणू शकतात किंवा अॅलर्जी देऊ शकतात. जर आपली त्वचा अॅक्ने-प्रोन असेल, तर बेंझॉयल पेरॉक्साइड किंवा सॅलिसिलिक अॅसिड असलेला फेस वॉश निवडा.
pH बॅलन्सकडे लक्ष द्या
त्वचेची नॅचरल pH लेव्हल 4.5 ते 5.5 दरम्यान असते. त्यामुळे असा फेस वॉश निवडा जो त्वचेची pH लेव्हल बॅलन्स राखेल. खूप अल्कलाइन किंवा अॅसिडिक फेस वॉश त्वचेचं नुकसान करू शकतो, ज्यामुळे त्वचा कोरडी, लाल होऊ शकत किंवा त्वचेवर खाजही येऊ शकते. शक्यतो “pH Balanced” असे लिहिलेले प्रॉडक्ट निवडा.
सीझन आणि गरजेनुसार फेस वॉश बदला
ऋतूनुसार फेस वॉश बदलणेही महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात हलका आणि ऑयल-कंट्रोल फेस वॉश वापरा. हिवाळ्यात त्वचा कोरडी होऊ नये म्हणून मॉइश्चरायझिंग फॉर्म्युला निवडा. तसेच, जर तुम्ही जास्त प्रदूषणात राहत असाल किंवा हेवी मेकअप करत असाल, तर डीप क्लींजिंग फेस वॉश वापरू शकता. मात्र, दिवसातून दोन वेळांपेक्षा जास्त फेस वॉश वापरू नका.
ब्रँड आणि रिव्ह्यू तपासा, पण विचार करून घ्या
फेस वॉश खरेदी करण्यापूर्वी त्याचे रिव्ह्यू वाचा आणि विश्वासार्ह ब्रँड निवडा. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे फक्त इतरांच्या अनुभवावर अवलंबून राहू नका. शक्य असल्यास आधी ट्रायल पॅक किंवा सॅम्पल वापरून पाहा.
