Coconut Oil For Skin In Winter: हळूहळू हिवाळ्याची जाणीव होऊ लागली आहे. या दिवसांमध्ये तब्येत तर बिघडतेच, म्हणजे सर्दी-खोकल्यासोबतच त्वचेच्याही समस्या होतात. थोडी थंडी वाढली की, त्वचेवर कोरडेपणा वाढतो. थंड वारे त्वचेतील ओलसरपणा नष्ट करतात. ज्यामुळे त्वचा कोरडी आणि नीरस दिसू लागते. अशावेळी त्वचेचा कोरडेपणा कमी करणे आणि ओलसरपणा टिकवून ठेवण्यासाठी अनेक लोक खोबऱ्याचं तेल वापरतात. बहुतेक लोक डोक्याच्या त्वचेसोबत इतर भागांसाठीही खोबऱ्याचं तेल फायदेशीर मानतात. खोबऱ्याचं तेल त्वचेत ओलसरपणा टिकवून ठेवतं असं मानलं जातं. पण हे त्वचेवर लावणे सुरक्षित आहे का? चला एक्सपर्टकडून जाणून घेऊयात.
खोबऱ्याचं तेल त्वचेवर लावल्यास काय होतं?
आयुर्वेदिक डॉक्टर आणि स्किन एक्सपर्ट निजाला यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये त्या सांगतात की, खोबऱ्याच्या तेलात नॅचरल मॉइश्चरायझिंग गुण असतात. हे त्वचेवर एक सुरक्षित थर तयार करतं. ज्यामुळे त्वचा मुलायम राहते. म्हणूनच बरेच लोक याचा रोजच्या स्किनकेअर रूटीनमध्ये समावेश करतात.
आयुर्वेद काय सांगतं?
आयुर्वेदानुसार खोबऱ्याचं तेल 'शीतल', म्हणजे थंड असतं. त्याचा स्वभाव थंड आणि थोडा चिकट असतो. उन्हाळ्यात हे शरीराला थंडावा देण्यास आणि त्वचेला शांत ठेवण्यास मदत करतं. पण हिवाळ्यात त्याचा परिणाम उलटा होऊ शकतो.
हिवाळ्यात खोबऱ्याचं तेल का टाळावे?
डॉक्टर निजाला सांगतात की, थंडीच्या दिवसांत जेव्हा शरीराचे तापमान आधीच कमी असते, तेव्हा थंड खोबऱ्याचं तेल वापरल्यास त्वचा आणखी कोरडी वाटू शकते. त्यामुळे हिवाळ्यात खोबऱ्याचं तेल वापरण्याचा सल्ला दिलेला नाही.
याशिवाय, जर तुमची त्वचा तेलकट आहे किंवा अॅक्ने येतात. तर खोबऱ्याचं तेल टाळणेच चांगले. हे कोमेडोजेनिक आहे, म्हणजे रोमछिद्र बंद करू शकतं, ज्यामुळे पिंपल्स आणि ब्लॅकहेड्सची समस्या वाढू शकते.
जर तुमची त्वचा सामान्य किंवा कोरडी असेल, तर उन्हाळ्यात त्वचेवर खोबऱ्याचं हलकं तेल लावता येईल. पण हिवाळ्यात यापासून दूर राहणे चांगले आहे.
