lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > Blackheads Removal Tips : खूप ब्लॅकहेट्स आलेत? थकल्यासारखे दिसताय? 'या' सोप्या उपायांनी ब्लॅकहेट्स घालवून मिळवा ग्लोईग चेहरा

Blackheads Removal Tips : खूप ब्लॅकहेट्स आलेत? थकल्यासारखे दिसताय? 'या' सोप्या उपायांनी ब्लॅकहेट्स घालवून मिळवा ग्लोईग चेहरा

How to remove blackheads : नाकावरचे ब्लॅकहेड्स काढण्यासाठी हा एक चांगला अँटीबॅक्टेरियल स्क्रब आहे. लिंबामध्ये आढळणारे सायट्रिक ऍसिड चेहऱ्याला उजळ करते आणि त्वचेच्या छिद्रांमध्ये असलेल्या जंतूंशी लढते. हे चेहऱ्यावरील कोरड्या आणि मृत पेशी काढून टाकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 03:02 PM2021-11-01T15:02:20+5:302021-11-01T15:32:54+5:30

How to remove blackheads : नाकावरचे ब्लॅकहेड्स काढण्यासाठी हा एक चांगला अँटीबॅक्टेरियल स्क्रब आहे. लिंबामध्ये आढळणारे सायट्रिक ऍसिड चेहऱ्याला उजळ करते आणि त्वचेच्या छिद्रांमध्ये असलेल्या जंतूंशी लढते. हे चेहऱ्यावरील कोरड्या आणि मृत पेशी काढून टाकते.

Blackheads Removal Tips Skin care Tips : How to remove blackheads on nose with home remedies | Blackheads Removal Tips : खूप ब्लॅकहेट्स आलेत? थकल्यासारखे दिसताय? 'या' सोप्या उपायांनी ब्लॅकहेट्स घालवून मिळवा ग्लोईग चेहरा

Blackheads Removal Tips : खूप ब्लॅकहेट्स आलेत? थकल्यासारखे दिसताय? 'या' सोप्या उपायांनी ब्लॅकहेट्स घालवून मिळवा ग्लोईग चेहरा

चेहऱ्यावर धूळ, घाणीच्या संसर्गामुळे ब्लॅकहेड्स होतात. जेव्हा त्वचेची छिद्रे तेल आणि घाणेत अडकतात तेव्हा असं होते. अशावेळी घरच्या घरी ब्लॅकहेड्स काढण्यासाठी फेस मास्क बनवता येऊ शकतो. त्यानं चेहरा स्क्रब करा, ज्यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल, घाण आणि मृत पेशी निघून जातील. दिवाळीला चेहरा सुंदर दिसण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की फायदेशीर ठरतील (Diwali Special Skin Care Tips) घरच्याघरी ग्लोईंग त्वचा मिळवण्यासाठी  काय करता येईल याबबत काही नवीन आयडिया आम्ही तुम्हाला देणार आहोत. (Blackheads removal tips in marathi)  

लिंबू आणि मीठ (Lemon and salt)

नाकावरचे ब्लॅकहेड्स काढण्यासाठी हा एक चांगला अँटीबॅक्टेरियल स्क्रब आहे. लिंबामध्ये आढळणारे सायट्रिक ऍसिड चेहऱ्याला उजळ करते आणि त्वचेच्या छिद्रांमध्ये असलेल्या जंतूंशी लढते. हे चेहऱ्यावरील कोरड्या आणि मृत पेशी काढून टाकते. एक चमचा मीठ, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा पाणी एकत्र करून ब्लॅकहेडच्या भागावर लावा आणि हलक्या हातांनी २ ते ५ मिनिटे मसाज करा. थोड्या वेळाने कोमट पाण्याने धुवा. हे लावून उन्हात जाणे टाळा कारण लिंबू चेहरा संवेदनशील बनवते.

ओट्स मिल (Oats Meal)

ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी ओट्स, संत्र्याच्या सालीची पावडर आणि दही एकत्र करून ब्लॅकहेडच्या भागावर हलक्या हातांनी मसाज करा. हा मसाज तुम्हाला 2 ते 4 मिनिटे चेहऱ्यावर गोलाकार हालचालीत हात फिरवून करावा लागेल. यामुळे चेहरा खोलवर स्वच्छ होतो.

दिवाळीला साडीवर हेअरस्टाईल कोणती शोभेल? सौंदर्य खुलवतील 'या' एकापेक्षा एक सोप्या हेअरस्टाईल्स

दूध-जायफळ (Milk and Nutmeg)

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर हा उपाय नाकावरचे ब्लॅकहेड्स काढण्यासाठी खूप प्रभावी आहे. जायफळ त्वचेचे अतिरिक्त तेल कमी करते. उग्र जायफळ पावडर देखील एक चांगला स्क्रबर आहे. दोन चमचे जायफळात थोडेसे दूध मिसळून पेस्ट तयार करा आणि हात गोलाकार हालचालीत 3 ते 4 मिनिटे स्क्रब करा. यानंतर चेहरा व्यवस्थित धुवा, एकही ब्लॅकहेड राहणार नाही.

अंड (Egg)

ब्लॅकहेड्स दूर करण्याचा उत्तम उपाय म्हणजे चेहऱ्याला वाफ देऊन छिद्रे उघडणे आणि अंड्याचा पांढरा भाग चेहऱ्यावर लावणे. कोरडे झाल्यानंतर, जेव्हा तुम्ही ते  काढता तेव्हा ते ब्लॅक हेड्स निघून गेलेले दिसतील.

२ मिनिटात ग्लोईंग दिसेल काळपट, निस्तेज चेहरा; फक्त कच्च दूध लावा अन् डाग घालवा

स्टोबेरी (Strawberry)

स्ट्रॉबेरीमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स चेहऱ्याला गुळगुळीत आणि तरुण बनवतात. यामध्ये आढळणारे अल्फा हायड्रॉक्सिल अॅसिड चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्सचे अतिरिक्त तेल काढून टाकते. त्याच्या लगद्यामध्ये लिंबाचा रस आणि मध मिसळून पेस्ट बनवा. 2 ते 3 मिनिटे घासून कोमट पाण्याने चेहरा धुवा.

ग्रीन टी (Gree Tea)

एक चमचा ग्रीन टी ची पाने घ्या आणि त्यात पाणी घालून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट ब्लॅकहेडच्या भागावर लावा आणि बोटांनी मसाज करा, जेणेकरून काळे डाग चांगले दूर होतील. या स्क्रबने छिद्रांमधले तेल निघून जाईल आणि काळे डाग दूर होतील. साधारण २ ते ३ मिनिटे नाकाभोवती ठेवल्यानंतर ते स्वच्छ धुवा.

 केस कोरडे झालेत, फार गळतात? जावेद हबीबनं सांगितला दाट केसांसाठी बेस्ट उपाय; स्पा करण्याची काही गरज नाही

दालचीनी (Cinnamon)

एक चमचा दालचिनी पावडर घ्या, त्यात चिमूटभर हळद आणि लिंबाचा रस घाला आणि चांगले मिसळा. ते ब्लॅकहेडच्या भागावर लावा आणि 10 ते 15 मिनिटे तसेच राहू द्या. चेहरा धुण्याआधी, काळ्या डागांवर चांगले घासून घ्या जेणेकरून ते मुळापासून निघून जातील.

केळ्याचं साल (Peel of banana)

केळीची साल घेऊन त्याचा आतील भाग चेहऱ्यावर चोळल्याने ब्लॅकहेड्स दूर होतील आणि चेहरा मुलायम आणि चमकदार होईल.

बटाटा (Potato)

कच्चा बटाटा सोलून त्याचे काप तयार करा. आता हे काप चेहऱ्यावरील ब्लॅकहेडेड भागावर लावा आणि हळू हळू मसाज करा. यामुळे त्वचा स्वच्छ होते आणि ब्लॅक हेड्स दूर होतात.

टूथपेस्ट (Toothpeste)

घरी वापरात असलेली टूथपेस्ट बोटावर घेऊन ब्लॅकहेडच्या भागावर लावा आणि 20-25 मिनिटे मसाज करा. यानंतर कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून 3 वेळा हा उपाय करा, ब्लॅकहेड्स दूर होतील.

Web Title: Blackheads Removal Tips Skin care Tips : How to remove blackheads on nose with home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.