हल्ली प्रत्येकजणच आपापल्या कामात एवढा जास्त अडकून गेलेला आहे की आरोग्याकडे, सौंदर्याकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळच नाही.. त्यात आहाराकडेही बऱ्याचदा दुर्लक्ष होते. त्यामुळे मग तब्येतीच्याही वेगवेगळ्या तक्रारी मागे लागतात. त्यात आपल्या त्वचेला, केसांना नेहमीच धूळ, धूर, प्रदुषण, ऊन यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे केसांच्या आणि त्वचेच्या तक्रारीही आहेतच.. या सगळ्या तक्रारींवर जर उपाय हवा असेल तर मोरिंगा पावडर म्हणजेच शेवग्याच्या शेंगांची पावडर नेमाने खायला सुरुवात करा (best home hacks for reducing wrinkles). त्यामुळे आपल्या शरीराला काय लाभ होतो (benefits of moringa powder) आणि नेमकी कशा पद्धतीने मोरिंगा पावडर खायला हवी ते पाहूया..(use of moringa powder for glowing skin and hair growth)
शेवग्याच्या शेंगांची पावडर खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे
शेवग्याच्या शेंगांमध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए आणि इतर पौष्टिक घटक भरपूर प्रमाणात असतात.
मोरिंगा पावडरमध्ये लोह आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे ज्यांना ॲनिमियाचा त्रास असेल किंवा खूप लवकर थकवा येत असेल अशा व्यक्तींना मोरिंगा पावडर खाणे फायद्याचे ठरते.
'या' कारणांमुळे महिलांनी उपवास करणं गरजेचं! व्यायाम केल्याने फिट राहाल, पण वजन घटविण्यासाठी....
मोरिंगा पावडर नियमितपणे घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठीही मदत होते.
मोरिंगा पावडर केसांच्या आरोग्यासाठी आणि त्वचेचं सौंदर्य, तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरते.
त्वचेवर छान चमक येण्यासाठी तसेच कमी वयातच चेहऱ्यावर दिसू लागलेल्या बारीकशा सुरकुत्या नाहीशा करण्यासाठीही मोरिंगा पावडर उपयुक्त ठरते.
मोरिंगा पावडर कशा पद्धतीने खावी?
मोरिंगा पावडर आपल्या आहारात कशा पद्धतीने घ्यावी, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ rohitsachdeva1 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एकूण ३ पद्धती सांगितल्या आहेत. त्यापैकी तुम्हाला जी योग्य वाटेल त्याप्रमाणे तुम्ही ती खाऊ शकता.
स्वयंपाकासाठी तुम्ही चुकीचं तेल वापरता म्हणून वाढतोय लठ्ठपणा-हृदयरोग, पाहा कोणतं तेल वापरणं योग्य..
१. पहिली पद्धत म्हणजे १ ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मोरिंगा पावडर घाला. पाणी व्यवस्थित हलवून घ्या आणि सकाही उपाशीपोटी प्या.
२. दुसरा पर्याय म्हणजे अर्धा चमचा मोरिंगा पावडर एक ते दिड चमचा दह्यामध्ये कालवून जेवणात घ्या..
३. तिसरा पर्याय म्हणजे मोरिंगा टी. यासाठी १ कप पाणी गॅसवर गरम करायला ठेवा. त्यामध्ये अर्धा चमचा मोरिंगा पावडर आणि थोडासा ज्येष्ठमध घाला. या पाण्याला दिड ते दोन मिनिटे चांगली उकळी येऊ द्या आणि त्यानंतर ते पाणी गाळून प्या..