Join us

तुरटी फिरवलेल्या पाण्यानं आंघोळ केल्यास मिळतात एकापेक्षा एक फायदे, आयुष्यभर विसरु नये असा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 14:23 IST

Alum Benefits in bathing water : तुम्ही रोज आंघोळीच्या पाण्यात जर तुरटीचा खडा फिरवला तर शरीराची दुर्गंधी, शरीरावरील मळ-मातीही निघून जाते. तसेच याचे इतरही अनेक फायदे मिळतात. 

Alum Benefits in bathing water : त्वचेच्या आणि केसांच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी खूप आधीपासून तुरटीचा वेगवेगळ्या पद्धतीनं वापर केला जातो. अनेकांना हे वाटतं की, तुरटी फक्त दाढी केल्यावरच त्वचेवर फिरवावी. पण असं काही नसतं. त्वचेसंबंधी अनेक समस्या दूर करण्यास तुरटी फायदेशीर ठरते. अनेकांना हे माहीत नसतं की, तुम्ही रोज आंघोळीच्या पाण्यात जर तुरटीचा खडा फिरवला तर शरीराची दुर्गंधी, शरीरावरील मळ-मातीही निघून जाते. तसेच याचे इतरही अनेक फायदे मिळतात. 

घामाची दुर्गंधी होईल दूर

तुरटीमध्ये नॅचरल अ‍ॅंटी-सेप्टिक गुण असतात, ज्यामुळे तुरटीच्या पाण्यानं आंघोळ केल्यास किंवा तुरटी काखेत लावल्यास घामाची दुर्गंधी दूर होण्यास मदत मिळते. अशात रोज तुरटीच्या पाण्यानंं आंघोळ करावी.

चेहरा दिसले तरूण

जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या असतील तर सकाळी तुरटीच्या पाण्याने आंघोळ करावी. इतकंच नाही तर तुरटीच्या पाण्यानं त्वचेची मालिश करा. सुरकुत्या गायब होतील.

सांधेदुखी आणि अंगदुखी होईल दूर

बऱ्याच शोधांमधून समोर आलं आहे की, तुरटीच्या पाण्यानं आंघोळ केल्यास शरीराच्या दुर्गंधी सोबतच सांधेदुखी दूर होते आणि नसाही मोकळ्या होतात. कोमट पाण्यात तुरटी फिरवून आंघोळ केल्याने सांधेदुखी कमी होते.

केस आणि डोक्याची त्वचा साफ होते

तुरटीमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. हे केस आणि डोक्याची त्वचा स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. ज्या लोकांच्या डोक्यात उवा आहेत आणि ज्यांना कोंड्याची समस्या आहे त्यांनी आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवून आंघोळ करावी.

प्रायव्हेट पार्टची स्वच्छता

महिलांना नेहमीच यूरिन इन्फेक्शनची समस्या होत असते. अशात दिवसातून दोन वेळा तुरटीच्या पाण्याने प्रायव्हेट पार्ट स्वच्छ केले तर फायदा मिळेल.

घाम होईल कंट्रोल

उन्हाळा असो वा हिवाळा ज्या लोकांना जास्त घाम येतो अशांसाठीही तुरटी फायदेशीर ठरते. कारण तुरटीच्या पाण्यानं आंघोळ केल्यास घाम कंट्रोल करण्यास मदत मिळते. अशात ज्यांना जास्त घाम येतो त्यांनी तुरटी फिरवलेल्या पाण्याने आंघोळ करावी.

टॅग्स :त्वचेची काळजीकेसांची काळजीहेल्थ टिप्स