Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > Beauty Tips : उन्हामुळे ओठांभोवतीची त्वचा काळवंडली? ३ घरगुती उपाय-ओठ दिसतील सुंदर

Beauty Tips : उन्हामुळे ओठांभोवतीची त्वचा काळवंडली? ३ घरगुती उपाय-ओठ दिसतील सुंदर

Beauty Tips: Darkened Skin Around Lips Due to Sun? Try These 3 Home Remedies for Soft, Beautiful Lips : ओठांच्या आजूबाजूचा भाग सुंदर ठेवा. करा हे उपाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2026 16:44 IST2026-03-26T16:39:49+5:302026-03-26T16:44:35+5:30

Beauty Tips: Darkened Skin Around Lips Due to Sun? Try These 3 Home Remedies for Soft, Beautiful Lips : ओठांच्या आजूबाजूचा भाग सुंदर ठेवा. करा हे उपाय.

Beauty Tips: Darkened Skin Around Lips Due to Sun? Try These 3 Home Remedies for Soft, Beautiful Lips | Beauty Tips : उन्हामुळे ओठांभोवतीची त्वचा काळवंडली? ३ घरगुती उपाय-ओठ दिसतील सुंदर

Beauty Tips : उन्हामुळे ओठांभोवतीची त्वचा काळवंडली? ३ घरगुती उपाय-ओठ दिसतील सुंदर

उन्हाळा सुरू झाला की त्वचेच्या तक्रारी वाढायला लागतात आणि त्यात ओठाभोवतीचा भाग काळवंडणे व जळजळ होणे ही समस्या अनेकांसाठी त्रासदायक ठरते. चेहर्‍याचा हा भाग अतिशय नाजूक असल्यामुळे उन्हाची तीव्रता, घाम, धूळ आणि त्वचेतील ओलावा कमी होणे याचा परिणाम सर्वात आधी इथेच दिसून येतो. सुरुवातीला हलका काळेपणा जाणवतो, पण दुर्लक्ष केल्यास तो वाढत जातो आणि त्यासोबतच त्वचा राठ, कोरडी होते. 

या समस्येमागे अनेक कारणे असतात. उन्हात जास्त वेळ राहिल्याने त्वचेतील मेलानिनचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे त्वचा काळवंडते. (Beauty Tips: Darkened Skin Around Lips Due to Sun? Try These 3 Home Remedies for Soft, Beautiful Lips)त्याचबरोबर घामामुळे त्या भागात इरिटेशन होते. काही लोकांना वारंवार ओठ चाटण्याची सवय असते, ज्यामुळे त्वचा आणखी कोरडी होते आणि जळजळ वाढते. पाण्याची कमतरता, चुकीचे स्किनकेअर प्रॉडक्ट्स आणि केमिकलयुक्त लिप प्रॉडक्ट्स यांचाही यावर परिणाम होतो.

अशा वेळी महागडी उत्पादने वापरण्याऐवजी घरच्या घरी सोपे आणि नैसर्गिक उपाय खूप उपयोगी ठरु शकतात. चंदन हा त्यातील एक उत्तम उपाय आहे. चंदनात नैसर्गिक थंडावा देणारे गुणधर्म असतात. चंदन पावडरमध्ये गुलाबपाणी घालून तयार केलेली पेस्ट ओठाभोवती लावल्यास त्वचेला शांतता मिळते, जळजळ कमी होते आणि हळूहळू काळेपणाही कमी होतो. तूप हा आणखी एक सोपा पण प्रभावी उपाय आहे. आपल्या घरात सहज उपलब्ध असलेले शुद्ध तूप त्वचेला आतून पोषण देते. रात्री झोपण्यापूर्वी ओठाभोवती थोडे तूप लावल्यास त्वचा मऊ राहते, कोरडेपणा कमी होतो आणि काळवंडलेला भाग हळूहळू उजळू लागतो.

काकडीसारखे थंड पदार्थही या समस्येत खूप फायदेशीर ठरतात. काकडीचा रस त्वचेवर लावल्याने लगेच थंडावा मिळतो आणि उन्हामुळे झालेला टॅन कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे दही आणि मध यांचा वापर केल्यास त्वचेला मॉइश्चर मिळते. दही त्वचा मऊ करते तर मध ओलावा टिकवून ठेवतो, त्यामुळे जळजळ कमी होऊन त्वचा फ्रेश दिसते. यासोबतच शरीरात पुरेसे पाणी असणे खूप गरजेचे आहे. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी कमी होते आणि त्याचा परिणाम त्वचेवर दिसतो. त्यामुळे भरपूर पाणी पिणे, ताज्या फळांचा आहारात समावेश करणे आणि त्वचेची स्वच्छता राखणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच काही सवयी टाळणेही गरजेचे आहे. सतत ओठ चाटणे, हार्श स्क्रब वापरणे किंवा केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स लावणे यामुळे समस्या वाढू शकते. उन्हात बाहेर पडताना चेहऱ्याचे संरक्षण करणेही आवश्यक आहे. त्यामुळे योग्य ती काळजी घ्या. 

Web Title : धूप से होंठ काले? सुंदर होंठों के लिए 3 घरेलू उपाय

Web Summary : गर्मी में होंठों के आसपास की त्वचा काली पड़ जाती है। चंदन, घी, खीरा ठंडक पहुंचाते हैं और रंगत निखारते हैं। हाइड्रेशन और सौम्य स्किनकेयर ज़रूरी है। कठोर उत्पादों से बचें।

Web Title : Sun-Darkened Lips? 3 Home Remedies for Beautiful, Soft Lips

Web Summary : Summer darkens skin around lips. Chandan, ghee, cucumber cool and lighten. Hydration and gentle skincare are key. Avoid harsh products, lip licking.