Join us

अनेक प्रयत्न करूनही रात्री झोप येत नसेल तर लगेच करा 'हा' आयुर्वेदिक उपाय, झोपेचा प्रश्न सुटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 15:26 IST

Ayurveda Sleeping Tips : रात्री जर तुम्ही झोपण्याआधी तळपायांवर एक तेल लावलं तर तुम्हाला लगेच आणि चांगली झोप येण्यास मदत मिळू शकते.

Ayurveda Sleeping Tips : सकाळपासून दिवसभर वेगवेगळी कामं आणि कामांसाठी केलेली धावपळ यामुळे शरीर थकून जातं. तसं पाहिलं तर शरीर थकल्यावर रात्री लगेच झोप यायला हवी. पण अनेकांना रात्री अनेक प्रयत्न करूनही झोप येत नाही. याची कारणं वेगवेगळी असू शकतात. तुम्हालाही झोप न येण्याची (Sleeping Problem Causes) समस्या असेल किंवा लवकर झोप येतच नसेल तर एक खास उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. रात्री जर तुम्ही झोपण्याआधी तळपायांवर एक तेल लावलं तर तुम्हाला लगेच आणि चांगली झोप येण्यास मदत मिळू शकते. आयुर्वेदिक एक्सपर्टनं याबाबत खास टिप्स दिल्या आहेत. ज्या तुम्ही नेहमी फॉलो करू शकता.

र आयुर्वेदिक कंसल्टेंट डॉक्टर सुगंधा शर्मा यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आह. ज्यात त्यांनी सांगितलं की, रात्री डोक्यात वेगवेगळ्या गोष्टी सुरू राहत असल्यानं लगेच झोप येत नाही. झोप चांगली लागण्यासाठी 2 ते 3 गोष्टी केल्या जाऊ शकतात. यातील एक म्हणजे रात्री थंड पाण्यानं पाय धुवून झोपावे.

शरीरात वाढलेला वात दोष झोप न येण्याचं कारण बनू शकतं. अशात हलकं कोमट मोहरीच्या तेलानं तळपायांवर मालिश करा. तेल थंड किंवा गरमही लावू शकता. मोठ्यांसोबतही लहान मुलांना सुद्धा झोप येत नसेल तर तळपायांवर यानं मालिश करा. तुम्हाला लगेच झोप लागेल.

मोहरीच्या तेलाने तळपायांची मालिश करण्याचे फायदे

चांगली झोप लागते

रात्री जर तुम्हाला लवकर आणि चांगली झोप येत नसेल तर मोहरीचं तेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. मोहरीच्या तेलाने तळपायांची मालिश करा. याने तुम्हाला चांगली झोप येईल.

तणाव होईल कमी 

तळपायांची तेलाने मालिश केल्याने मेंदुमध्ये ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. ज्यामुळे चांगली झोपही येते. सोबतच तुमचा मानसिक तणावही कमी होतो.

ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं

रात्री झोपण्याआधी तळपायांची मोहरीच्या तेलाने मालिश केल्यावर चांगली झोप येते. तसेच तेलाने मालिश केल्याने शरीरात ब्लड सर्कुलेशन सुरळती होतं. याने ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहण्यात मदत मिळते.

डोकं होईल शांत

डोकं शांत करण्यासाठी आणि चिंता दूर करण्यासाठी रात्री झोपण्याआधी मोहरीच्या तेलाने तळपायांची मालिश करा. याने तुम्हाला फायदे होईल. 

मासिक पाळीच्या वेदना कमी होतील

तळपायांची मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने तुम्हाला मासिक पाळीत होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत होईल. 

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्स