सध्या सोशल मीडियावर एक फेसपॅक खूप व्हायरल झाला आहे. दूध, मसूर डाळ, हळद, बेसन आणि चंदन या मिश्रणातून तयार केलेला हा नैसर्गिक फेसपॅक सौंदर्यवर्धक आणि त्वचेला ताजेतवाने ठेवणारा मानला जातो. (Apply this lentil face pack, your face will shine like a diya on Diwali)घरच्या घरी सहज तयार होणारा हा पॅक अनेकांना फायदेशीर ठरत आहे. कारण यात केमिकल नाही तर त्वचेला नैसर्गिक पोषण देणारे घटक आहेत.
या फेसपॅकचे फायदे अनेक आहेत. दूध त्वचेला मऊ आणि सुंदर करते, त्यातील लॅक्टिक अॅसिडमुळे त्वचेवरील मृत पेशी काढता येतात. मसूर डाळ त्वचा उजळवण्यासाठी प्रसिद्ध आहे, ती त्वचेतील घाण आणि तेलकटपणा कमी करते. हळद ही नैसर्गिक अँण्टीसेप्टिक असल्याने त्वचेवरील दाह, पिंपल्स किंवा पुरळ कमी करण्यात मदत करते. बेसन त्वचा स्वच्छ आणि टवटवीत ठेवते. तसेच तेलकटपणा कमी करुन निखळ चमक मिळते. तर चंदन चेहर्याला थंडावा देतं आणि तजेला वाढवतं. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे चेहर्याला सुंदर असा रंग, मऊपणा आणि नैसर्गिक ग्लो मिळतो.
मात्र प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे हा पॅक सर्वांसाठी योग्य असेलच असं नाही. ज्यांची त्वचा अतिशय कोरडी, संवेदनशील किंवा ज्यांना दुध, बेसन किंवा हळदीमुळे अॅलर्जी होते त्यांनी हा पॅक वापरणं टाळावं. प्रथम हातावर थोडं लावून चाचणी घेणं आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचं तर, हा व्हायरल फेसपॅक खरंच अनेकांसाठी उपयुक्त ठरु शकतो. पण तो अंधानुकरणाने लावू नये. योग्य प्रमाणात आणि त्वचेला सूट होत असेल तरच वापरा. नियमित वापरल्यास चेहरा उजळतो, निखळतो आणि नैसर्गिक सौंदर्य खुलून येते. पाहा कसा तयार करायचा.
साहित्य
दूध, मसूर डाळ, बेसन, हळद, चंदन
कृती
१. एका वाटीत चार चमचे दूध घ्यायचे. त्यात चार चमचे मसूर डाळ भिजवायची. एका तासाने ते मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्यायचे. पातळ पेस्ट करायची. त्यात चमचाभर बेसन, थोडी हळद, थोडे चंदन घालायचे. मिश्रण ढवळायचे. एकजीव करायचे.
२. चेहऱ्याला लावायचे आणि तासभर ठेवायचे. मग साध्या पाण्याने धुवायचे आणि मऊ कॉटनच्या कापडाने चेहरा टिपायचा. नक्कीच आराम मिळेल.