lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > केसांचं नैसर्गिक सौंदर्य हरवलं ? केसांना लावा ४ प्रकारचे तेल, केस दिसतील काळेभोर - घनदाट..

केसांचं नैसर्गिक सौंदर्य हरवलं ? केसांना लावा ४ प्रकारचे तेल, केस दिसतील काळेभोर - घनदाट..

Best Homemade Oils For Hair Growth & Thickness : पातळ केसांना घनदाट करतील तेलाचे हे ४ प्रकार, काही दिवसात दिसेल फरक....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2023 09:24 PM2023-09-08T21:24:34+5:302023-09-08T21:45:08+5:30

Best Homemade Oils For Hair Growth & Thickness : पातळ केसांना घनदाट करतील तेलाचे हे ४ प्रकार, काही दिवसात दिसेल फरक....

Apply 4 types of oil on hair for faster hair growth. | केसांचं नैसर्गिक सौंदर्य हरवलं ? केसांना लावा ४ प्रकारचे तेल, केस दिसतील काळेभोर - घनदाट..

केसांचं नैसर्गिक सौंदर्य हरवलं ? केसांना लावा ४ प्रकारचे तेल, केस दिसतील काळेभोर - घनदाट..

आपल्यापैकी प्रत्येक स्त्रीला आपले केस लांबसडक, जाड, घनदाट असावेत असे वाटत असते. परंतु सध्या केस गळणे ही प्रत्येकीचीच एक गंभीर तक्रार झाली आहे. केस गळतीच्या समस्येसोबतच केस रुक्ष होणे, केसांचा पोत बिघडणे, केसांची वाढ खुंटणे, केस पातळ होणे यांसारख्या इतर समस्या देखील उद्भवतात. कधीकधी केस इतके खराब होतात की कोणतीही केसांची हेयर स्टाईल करण्याची इच्छा असूनही करता येत नाही. केसांची निगा राखणारी अनेक उत्पादने आणि हेअर फॉल विरोधी प्रॉडक्ट्स वापरुन देखील केसांच्या समस्या दूर होत नाहीत. केसांच्या या कायमच्या समस्या दूर करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक तेल, महागडे हेअर ऑईल, हेअर मास्क असे असंख्य प्रकार आपल्या केसांवर लावून बघतो(BEST HOMEMADE HAIR OIL FOR HAIR GROWTH).

बाहेर विकत मिळणाऱ्या या हेअर प्रॉडक्ट्समध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स असतात. याच्या सतत वापराने केसांच्या मुळांना इजा पोहोचू शकते. अशावेळी केसांसाठी नैसर्गिक किंवा घरगुती हेअर प्रॉडक्ट्सचा वापर करणे गरजेचे असते. तेल हे केसांच्या मुळांना व केसांना मजबूत आणि बळकट बनवण्यास मदत करते. परंतु जर या तेलातच केमिकल्स वापरले असतील तर यामुळे केसांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. असे होऊ नये म्हणून आपण घरगुती तेलाचा (Best Homemade Hair Oils For Faster Hair Growth) वापर करून केसांच्या होणाऱ्या अनेक समस्या दूर ठेवू शकतो(Homemade Herbal Hair Oil-Oil for Faster Hair Growth-Herbal Hair Oil for Thicker Hair-Onion Hair Oil).

कोणती तेल वापरल्याने केसांच्या समस्या दूर होतात.... 

१. कांद्याचे तेल :- कांदा आणि कडीपत्ता बारीक चिरून घ्यावा. आता ते एकत्रित मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. या पेस्टमध्ये खोबरेल तेल मिसळून घ्यावे. ५ ते १० मिनिटे मंद आचेवर हे तेल गरम करून घ्यावे. आता गाळणीने गाळून हे तेल एका बाटलीत भरून ठेवावे. कांदा केसांसाठी खूप चांगला मानला जातो. कांद्यातुन निघणारा रस केसांसाठी खूप फायदेशीर असतो. यापासून बनवलेले तेल केसांच्या वाढीसाठी चांगले असते. हे तेल लावल्याने केसांची वाढ झपाट्याने होते.आठवड्यातून दोनदा हे तेल केसांना लावल्याने केस वेगाने वाढू लागतील. 

काळेभोर केस हवे ? तुळशीचा करा 'असा' वापर, केस होतील मऊ मुलायम सुंदर...

२. मेथीचे दाणे व कडीपत्ता तेल :- मेथीचे दाणे व कडीपत्ता खोबरेल तेलात भिजवत ठेवा. ते व्यवस्थित भिजल्यानंतर हे सगळे मिश्रण गॅसच्या मंद आचेवर गरम करून घ्यावे. त्यानंतर हे तेल गाळून घेऊन एका बाटलीत भरून ठेवावे. कढीपत्ता आणि मेथीचे दाणे केसांसाठी चांगले असतात. हे लावल्याने केसांना आवश्यक पोषण मिळते आणि ते दाट आणि लांब दिसतात. यासोबतच केसांची हरवलेली चमकही परत येते. आठवड्यातून २ ते ३ वेळा हे तेल केसांना लावावे. यामुळे केस लांब वाढतात आणि काळे आणि दाट दिसतात.

देवघरातली पांढरीशुभ्र गोष्ट फार मोलाची, डोक्याला लावा केसातला कोंडा होईल काही दिवसांत गायब...

३. एरंडेल तेल :- एरंडेल तेलाला कॅस्टर ऑइल देखील म्हणतात. हे तेल चिकट स्वरूपाचे असते, म्हणून त्यात खोबरेल तेल मिसळून केसांवर लावा. एरंडेल तेलामध्ये अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी फंगल गुण असतात. ज्यामुळे केसांचे अनेक समस्या सुटतात. ज्यामुळे केस काळेभोर घनदाट दिसतात.

बिया इतक्या छोट्या पण केसांच्या सौंदर्यात पडेल भर...आता घरीच बनवा केसांसाठी होममेड नैसर्गिक कंडिशनर !!

४. बदाम तेल :- बदाम तेल केसांसाठी फायदेशीर ठरते. बदाम तेल व्हिटॅमिन ई, ओमेगा -३, फॅटी ऍसिडचा उत्तम स्रोत आहे. या तेलातून केसांना प्रोटीन्स देखील मिळतात. केसांवर लावण्यासाठी बदाम तेल कोमट गरम करा. नंतर तेल स्कॅल्पवर लावून मसाज करा. यामुळे केसांचे क्यूटिकल उघडतात. ज्यामुळे केसांना आवश्यक पोषण मिळते.

केसांना मेहेंदी लावताना त्यात मिसळा १ सिक्रेट गोष्ट, केसांवर मेहेंदीचा रंग टिकेल भरपूर दिवस...

Web Title: Apply 4 types of oil on hair for faster hair growth.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.