Lokmat Sakhi >Beauty > बिया इतक्या छोट्या पण केसांच्या सौंदर्यात पडेल भर...आता घरीच बनवा केसांसाठी होममेड नैसर्गिक कंडिशनर !!

बिया इतक्या छोट्या पण केसांच्या सौंदर्यात पडेल भर...आता घरीच बनवा केसांसाठी होममेड नैसर्गिक कंडिशनर !!

How To Make Conditioning Flax Seed Gel : कंडिशनरच्या वापरामुळे केस मुलायम आणि निरोगी राहण्यास मदत होते, अळशीच्या बियांचे नैसर्गिक कंडिशनर वाढवेल केसांचे सौंदर्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2023 07:25 PM2023-08-26T19:25:19+5:302023-08-26T19:52:05+5:30

How To Make Conditioning Flax Seed Gel : कंडिशनरच्या वापरामुळे केस मुलायम आणि निरोगी राहण्यास मदत होते, अळशीच्या बियांचे नैसर्गिक कंडिशनर वाढवेल केसांचे सौंदर्य...

Recipe for home made hair conditioner using flax seeds. | बिया इतक्या छोट्या पण केसांच्या सौंदर्यात पडेल भर...आता घरीच बनवा केसांसाठी होममेड नैसर्गिक कंडिशनर !!

बिया इतक्या छोट्या पण केसांच्या सौंदर्यात पडेल भर...आता घरीच बनवा केसांसाठी होममेड नैसर्गिक कंडिशनर !!

काहीवेळेला आरोग्य आणि सौंदर्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू या आपल्या घरातच असतात, पण आपल्याला कळत नाहीत. कारण आपल्याला त्याच महत्त्व माहितच नसतं. फ्लॅक्स सीड्स (Flax Seeds) अर्थात अळशी हा पदार्थ त्यापैकीच एक आहे. अळशीच्या बिया (Flax Seeds) आपलं वजन कमी (Weight loss) करण्यापासून ते केसांच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. अळशीमध्ये ओमेगा - ३ फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण हे अधिक असते, याचा आपल्या केसांच्या वाढीसाठी व मजबूतीसाठी उपयोग होतो. इतकेच नव्हे तर, खराब आणि कोरड्या केसांसाठी अळशीच्या बिया हे गुणकारी औषध आहे. अळशीचा रोजच्या वापरात उपयोग  करून आपण कोंडा, खाज आणि केसगळतीसारख्या समस्यांपासून दूर राहू शकतो. याच्या नियमित वापराने आपल्याला केसांच्या होणाऱ्या अनेक समस्यांपासून नक्कीच सुटका मिळते.

केस धुवून झाल्यावर केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण न विसरता केसांना कंडिशनिंग करतो. केसांना कंडिशनिंग करताना आपण बाजारांत विकत मिळणाऱ्या महागड्या व केमिकल्सयुक्त कंडिशनरचा वापर करतो. परंतु अशा कंडिशनरमुळे केसांचे आरोग्य व सौंदर्य सुधारण्याऐवजी आणखीनच बिघडते. अशावेळी काही घरगुती उपायांचा वापर करून आपण केसांचे हरवलेले सौंदर्य पुन्हा मिळवू शकतो. सगळ्यांच्याच घरात सहज उपलब्ध असणाऱ्या छोट्याशा अळशीच्या बियांचा वापर करून आपण होममेड हेअर कंडिशनर बनवून (Recipe for home made hair conditioner using flax seeds) केसांना लावू शकतो. अळशीच्या बिया वापरून होममेड कंडिशनर (Flaxseed Hair Conditioner) कसे बनवावे याची कृती पाहूयात(Recipe for home made hair conditioner using flax seeds).

अळशीच्या बियांचे होममेड कंडिशनर कसे बनवावे ? 

१. एका भांड्यात १ टेबलस्पून (लहान केसांसाठी) किंवा २ टेबलस्पून (मोठ्या केसांसाठी) अळशीच्या बिया घेऊन त्यात ५ ते १० मिनिटे पाण्यांत भिजत ठेवाव्यात.      

२. आता हे पाणी व अळशीच्या बिया दोन्ही गॅसच्या मंद आचेवर ठेवून ५ ते १० मिनिटे उकळवून घ्यावे. 

३. उकळवून घेतल्यानंतर ते गरम असतानाच एका गाळणीने व्यवस्थित गाळून घ्यावे. अळशीच्या बिया गाळून जे पाणी उरेल तेच आपले होममेड नैसर्गिक कंडिशनर आहे. 

चेहरा तुम्ही रोज साधारण किती सेकंद धुता ? ६० सेकंद चेहरा धुण्याचे फायदे, नवा ट्रेण्ड म्हणतोय...

केसांना मेहेंदी लावताना त्यात मिसळा १ सिक्रेट गोष्ट, केसांवर मेहेंदीचा रंग टिकेल भरपूर दिवस...

महागड्या ट्रिटमेण्ट केल्यावर केसांना तेल लावावे की नाही ? हेअर एक्सपर्ट सांगतात, एक सिक्रेट...

४. हे कंडिशनर ज्या दिवशी बनवाल त्याच दिवशी ते केसांसाठी वापरावे. नंतरच्या वापरासाठी फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवू नये.

५. या कंडिशनरच्या अधिक चांगल्या परिणामासाठी आपण यात तांदूळ धुवून जे उरलेले पाणी असते ते देखील मिक्स करून वापरु शकता. 

६. केसांची दोन भागात व्यवस्थित विभागणी करा आणि हे कंडिशनर बोटांनी सगळ्या केसांना लावून तासभर तसेच ठेवून द्यावे. तासाभरानंतर केस साध्या  पाण्याने स्वच्छ धुवावेत.

Web Title: Recipe for home made hair conditioner using flax seeds.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.