Alum for sweat odor : वाढत्या तापमानामुळे येणारा जास्त घाम खरंच वैताग देणारा असतो. एकतर कपडे खराब होतात, अस्वस्थ वाटतं. त्याहून जास्त त्रासदायक असतो घामाचा येणारा वास. बसमध्ये, ट्रेनमध्ये, रिक्षात किंवा कुठेही लोक जवळ आले की सगळीकडे नुसती घामाची दुर्गंधी येते. काही लोकांच्या घामाची दुर्गंधी तर इतकी येते की, सहनही होत नाही. घामाची दुर्गंधी घालवण्यासाठी लोक नको नको ते उपाय करतात. महागडे डीओ किंवा परफ्यूम वापरले जातात. यांचा सुगंध लवकर उडतो. ज्यामुळे घामाची दुर्गंधी काही नेहमीची जात नाही. शिवाय यांपासून त्वचेचं होणारं नुकसान वेगळं. पण तुरटी एक असा उपाय आहे, ज्याच्या मदतीने आपली घामाची दुर्गंधी कायमची दूर होऊ शकते. अशात आपल्या आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना देखील त्रास होणार नाही. अशात तुरटी घामाची दुर्गंधी कशी दूर करते आणि तिचा वापर कसा करावा हे पाहुयात.
सल्फरने दुर्गंधी होते गायब
तुरटीमध्ये सल्फर नावाचं तत्व अधिक असतं आणि याच सल्फरमध्ये बॅक्टेरिया नष्ट करण्याची क्षमता असते. हेच कारण आहे की, जेव्हा आपण काखेत तुरटी लावता तेव्हा तेथील बॅड बॅक्टेरिया लगेच नष्ट होतात. त्यामुळे आंघोळ केल्यानंतर तुरटी थोडी पाण्यात भिजवून काखेत फिरवा. दिवसभर जराही घामाची दुर्गंधी येणार नाही. आपण तुरटी आंघोळीच्या पाण्यातही फिरवू शकता. याने पूर्ण शरीराला देखील फायदा मिळेल.
दोन आठवडे करा उपाय
तुरटी पाण्यात भिजवून काखेत आणि आपल्या मानेच्या आजूबाजूला हलक्या हाताने फिरवा. हा उपाय साधारण दोन आठवडे करा. त्यानंतर घाम कमी येईल आणि घामाची दुर्गंधी देखील कमी दूर होईल. तसेच तुरटीमध्ये पोटॅशिअम आणि अॅल्यूमिनिअमही असतं, ज्याने शरीर साफ राहण्यास मदत होते.
काखेतील काळे डागही होतील दूर
लिंबू आणि तुरटीच्या मिश्रणाची सुद्धा आपल्याला मदत मिळू शकते. हे तयार करण्यासाठी आधी तुरटीच्या पावडरमध्ये लिंबाचा रस टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट काखेत लावा आणि १० मिनिटांनंतर पाण्यानं धुवून टाका. काही दिवस हा उपाय केल्यावर आपल्याला काळपटपणा कमी झालेला दिसू शकतो.
तुरटीचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे याचे कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत. लावण्यासाठीही फार काही वेगळी आणि जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. दुकानात १० रूपयात आरामात तुरटीची साबण मिळू शकते. म्हणजेच काय तर महागड्या डीओ आणि परफ्यूमचा आपला खर्च देखील वाचतो.
