lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > मुलतानी मातीमध्ये ४ गोष्टी मिसळून चेहऱ्याला लावा, त्वचेवर होईल जादू- येईल कमालीचा ग्लो 

मुलतानी मातीमध्ये ४ गोष्टी मिसळून चेहऱ्याला लावा, त्वचेवर होईल जादू- येईल कमालीचा ग्लो 

How To Make Multani Mitti Face Pack: मुलतानी माती चेहऱ्याला लावणार असाल तर ती भिजवताना त्यात ४ पदार्थ टाका. बघा त्वचेवर कशी जादू होते ते...(beauty tips with multani mitti)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2024 09:09 AM2024-02-14T09:09:47+5:302024-02-14T09:10:01+5:30

How To Make Multani Mitti Face Pack: मुलतानी माती चेहऱ्याला लावणार असाल तर ती भिजवताना त्यात ४ पदार्थ टाका. बघा त्वचेवर कशी जादू होते ते...(beauty tips with multani mitti)

Add 4 ingredients in multani mitti for flawless glow, How to make multani mitti face pack | मुलतानी मातीमध्ये ४ गोष्टी मिसळून चेहऱ्याला लावा, त्वचेवर होईल जादू- येईल कमालीचा ग्लो 

मुलतानी मातीमध्ये ४ गोष्टी मिसळून चेहऱ्याला लावा, त्वचेवर होईल जादू- येईल कमालीचा ग्लो 

Highlights मुलतानी मातीचा फेसपॅक तयार करताना तुम्ही हे काही पदार्थ जर त्यात टाकले, तर नक्कीच तुमच्या त्वचेला अधिक फायदा होईल

चेहऱ्यावर कोणताही घरगुती उपाय करायचा असेल तर सगळ्यात सोपा आणि स्वस्तात मस्त उपाय म्हणजे मुलतानी माती. मुलतानी मातीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावला की त्यामुळे त्वचेचे पोषण तर होतेच, पण सैलसर पडत जाणारी त्वचा टाईट होण्यासाठीही तिचा उपयोग होतो. शिवाय त्वचेवरची डेड स्किन, टॅनिंग निघून जाऊन त्वचा तजेलदार होण्यासाठीही मुलतानी माती उपयुक्त ठरते. जर मुलतानी मातीचा फेसपॅक तयार करताना तुम्ही हे काही पदार्थ जर त्यात टाकले, तर नक्कीच तुमच्या त्वचेला अधिक फायदा होईल आणि त्वचेवर खूप छान चमक येईल. करून पाहा हा सोपा उपाय... (Add 4 ingredients in multani mitti for flawless glow)

 

मुलतानी मातीचा फेसपॅक कसा बनवायचा?

मुलतानी माती चेहऱ्याला लावण्यापुर्वी तिच्यामध्ये कोणकोणते पदार्थ टाकावेत, याची माहिती diybeautycoach या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

नाक चोंदल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो? ५ मिनिटांचा सोपा उपाय- चटकन नाक मोकळं होईल

यासाठी आपल्याला बटाट्याची एक फोड, टोमॅटोची एक फोड, लिंबाचा छोटासा तुकडा आणि १ चमचा दही एवढं साहित्य लागणार आहे.

सगळ्यात आधी तर वरील चारही पदार्थ मिक्सरच्या भांड्यात टाका आणि त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्या.

 

आता ही पेस्ट गाळणीने गाळून घ्या. जे काही पाणी उरेल त्या पाण्यात मुलतानी माती टाका. तसेच जेवढी मुलतानी माती टाकाल, त्याच्या निम्मं बेसन पीठ टाका.

उन्हाळ्याची चाहूल लागते आहे- बागेतल्या रोपांची काळजी घेण्यासाठी ४ गोष्टी करा, बहरून जाईल बाग

हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि त्यानंतर हा लेप चेहऱ्याला लावा. 

साधारण १० ते १२ मिनिटांनी मुलतानी मातीचा लेप सुकला की मग चेहरा धुवून टाका आणि व्यवस्थित मॉईश्चराईज करा. बघा हा उपाय केल्यानंतर चेहरा नक्कीच नेहमीपेक्षा जास्त चमकेल. बटाटा, लिंबू या नॅचरल ब्लीच एजंटमुळे आणि टोमॅटोतील पोषक घटकांमुळे त्वचेवर एक वेगळाच ग्लो येईल. 

 

Web Title: Add 4 ingredients in multani mitti for flawless glow, How to make multani mitti face pack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.