Lokmat Sakhi >Beauty > तुम्हाला पाहून सगळेच म्हणतील 'ब्युटीफूल'! फक्त ५ गोष्टी करा- पन्नाशीतही त्वचा राहील तरुण- सुंदर 

तुम्हाला पाहून सगळेच म्हणतील 'ब्युटीफूल'! फक्त ५ गोष्टी करा- पन्नाशीतही त्वचा राहील तरुण- सुंदर 

5 Tips For Young And Glowing Skin: त्वचेला कायम तरुण, सुंदर ठेवायचं असेल तर या काही टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी येऊ शकतात..(how to maintain beauty of your skin?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2025 15:35 IST2025-07-18T15:34:07+5:302025-07-18T15:35:06+5:30

5 Tips For Young And Glowing Skin: त्वचेला कायम तरुण, सुंदर ठेवायचं असेल तर या काही टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी येऊ शकतात..(how to maintain beauty of your skin?)

5 tips for young and glowing skin, how to maintain beauty of your skin, skin care hacks for radiant glow | तुम्हाला पाहून सगळेच म्हणतील 'ब्युटीफूल'! फक्त ५ गोष्टी करा- पन्नाशीतही त्वचा राहील तरुण- सुंदर 

तुम्हाला पाहून सगळेच म्हणतील 'ब्युटीफूल'! फक्त ५ गोष्टी करा- पन्नाशीतही त्वचा राहील तरुण- सुंदर 

Highlightsवय वाढलं तरी त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होणार नाही...

ज्या काही गोष्टींवर आपलं सौंदर्य अवलंबून असतं, त्यापैकी एक गोष्ट म्हणजे आपली त्वचा. त्वचा छान निरोगी, तजेलदार असेल तर आपण नक्कीच अधिक तरुण वाटू लागतो. पण बऱ्याचदा रोजच्या रोज वेगवेगळ्या कामांची आपल्यामागे एवढी गडबड असते की त्वचेसाठी पुरेसा वेळ काढणं होतच नाही. आता त्वचेची काळजी घ्यायची म्हणजे नेहमीच पार्लरमध्ये जाऊन महागड्या ब्यूटी ट्रिटमेंट्स घेऊन यायच्या असं मुळीच नाही. तुम्ही रोजच्या रोज अगदी सहज जमू शकतील अशा काही साध्या सोप्या गोष्टी केल्या तरी तुमच्या त्वचेवर खूप छान परिणाम दिसून येईल (how to maintain beauty of your skin?). वय वाढलं तरी त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होणार नाही (skin care hacks for radiant glow). अगदी पन्नाशीतही तुमची त्वचा तरुण आणि सुंदर राहील.(5 Tips For Young And Glowing Skin)

 

त्वचा नेहमीच तरुण, चमकदार ठेवण्यासाठी काय उपाय करावे?

त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय निमयितपणे करावे, याविषयीची माहिती सांगणारा व्हिडिओ ब्यूटी एक्सपर्टने healthbyneerusehrawat या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. 

लिंबू स्वस्त झाले, लगेच घ्या आणि 'या' पद्धतीने साठवून ठेवा- महिनाभर राहतील रसरशीत, फ्रेश 

१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आठवड्यातून ३ वेळा तरी चेहऱ्याला मसाज करा. मसाज करण्यासाठी तुम्ही बदाम तेल, खोबरेल तेल, ॲलोव्हेरा जेल किंवा माॅईश्चरायजरही वापरू शकता. यामुळे त्वचेचा टाईटनेस टिकून राहण्यास मदत होते.

२. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी रोज फेशियल योगा करा. आपल्या शरीराला फिट राहण्यासाठी जशी व्यायामाची गरज असते, तशीच आपल्या त्वचेलाही फिट राहण्यासाठी व्यायामाची गरज असते.

 

३. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दररोज भरपूर पाणी प्या. पुरेसं पाणी प्यायल्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते. तिच्यातलं नॅचरल मॉईश्चर टिकून राहातं.

टाॅयलेटमध्ये बराच वेळ बसूनही पोट साफ होत नाही? रामदेव बाबा सांगतात उपाय- त्रास कायमचा संपेल

४. घराबाहेर पडण्यापुर्वी चेहरा सुती कपड्याने व्यवस्थित बांधून घ्या. तसेच सनस्क्रिन लाावायला विसरू नका.

५. त्वचेचं तारुण्य, सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी हंगामी फळं पुरेशा प्रमाणात खाणंही खूप गरजेचं आहे. त्यातून मिळणारे ॲण्टीऑक्सिडंट्स आणि इतर घटक त्वचेला कायम टवटवीत, चमकदार ठेवण्यास मदत करतात. 



 

Web Title: 5 tips for young and glowing skin, how to maintain beauty of your skin, skin care hacks for radiant glow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.