lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > ५ सिंपल्स रुल्स, चेहऱ्यावर दिसणारच नाही वाढत्या वयाची खूण-चाळीशीतही दिसाल विशीप्रमाणे फ्रेश आणि तरुण

५ सिंपल्स रुल्स, चेहऱ्यावर दिसणारच नाही वाढत्या वयाची खूण-चाळीशीतही दिसाल विशीप्रमाणे फ्रेश आणि तरुण

5 Rules For Younger Skin After 40 : फक्त ५ सोपे बदल केले तरी आपल्या चेहऱ्यावर वाढलेल्या वयाची खूण दिसणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2023 05:50 PM2023-09-29T17:50:49+5:302023-09-29T17:51:33+5:30

5 Rules For Younger Skin After 40 : फक्त ५ सोपे बदल केले तरी आपल्या चेहऱ्यावर वाढलेल्या वयाची खूण दिसणार नाही

5 Rules For Younger Skin After 40 | ५ सिंपल्स रुल्स, चेहऱ्यावर दिसणारच नाही वाढत्या वयाची खूण-चाळीशीतही दिसाल विशीप्रमाणे फ्रेश आणि तरुण

५ सिंपल्स रुल्स, चेहऱ्यावर दिसणारच नाही वाढत्या वयाची खूण-चाळीशीतही दिसाल विशीप्रमाणे फ्रेश आणि तरुण

वाढत्या वयानुसार शरीरात बरेच बदल दिसून येतात. गंभीर आजार तर निर्माण होतातच, शिवाय स्किन आणि केसांवर देखील काही विशिष्ट बदल दिसून येतात. केस गळती, केसात कोंडा, केसांची वाढ खुंटणे, याशिवाय चेहऱ्यावर सुरकुत्या, फाईन लाईन्स, मुरुमांचे डाग, या कारणांमुळे आपलं वाढतं वय दिसून येते. बिघडलेल्या लाईफस्टाईलमुळे अनेकदा वयाच्या आधीच चेहऱ्यावर म्हातारपण दिसून येते.

वृद्धत्व थांबवणे कठीण आहे, परंतु काही सवयी बदलून आपण आपल्या स्किनची नक्कीच काळजी घेऊ शकतो. स्किन दीर्घकाळ तरुण आणि निरोगी दिसावी असं वाटत असेल तर, ५ गोष्टींना फॉलो करा. याची माहिती मॅटरनल आणि चाईल्ड पोषणतज्ज्ञ डॉ. रमिता कौर यांनी दिली आहे(5 Rules For Younger Skin After 40).

तज्ज्ञ म्हणतात, ''वृद्ध होणे ही नैसर्गिक प्रक्रिया जरी असली तरी, वेळीच काळजी घेणं आपल्या हातात आहे. जर आपली त्वचा कायम यंग दिसावी असं वाटत असेल तर, आपल्या दिनचर्येत ७ सवयींचा समावेश करा.'

१. नट्स खा

दिवसाची सुरुवात नेहमी भिजवलेले अक्रोड आणि बदाम खाऊन करा. अक्रोड पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. अक्रोडमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सपासून मुक्ती मिळवून वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करतात. याशिवाय यामध्ये असलेले व्हिटॅमिन-ई आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड त्वचेला सॉफ्ट करतात.

डार्क सर्कलमुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी झाले? एक चमचा कॉफीचा भन्नाट उपाय, काही दिवसात दिसेल फरक

बदामामध्ये व्हिटॅमिन ई असते. नियमित बदाम खाल्ल्याने शरीराला अँटी-ऑक्सिडंट्स मिळतात, जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करतात. रोज बदाम खाल्ल्याने बारीक रेषा, सुरकुत्या, डाग आणि डार्क सर्कल्स दूर होण्यास मदत होते.

२. व्हिटॅमिन सीयुक्त फळे

त्वचा तरुण आणि सुंदर दिसावी असं वाटत असेल तर, व्हिटॅमिन सीयुक्त फळे खा. शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असल्यास त्वचेवर सुरकुत्यांसोबतच इतरही अनेक समस्या दिसू लागतात. त्यामुळे आहारात संत्री, किवी, बेरी इत्यादींचा समावेश करा. याच्या सेवनाने कोलेजन तयार होण्यास मदत होते, ज्यामुळे त्वचा घट्ट होते.

३. भरपूर पाणी प्या

दररोज किमान ३ लिटर पाणी प्या. पाणी प्यायल्याने त्वचेतील रक्ताभिसरण वाढते. पाणी शरीराला हायड्रेट आणि ताजे ठेवते. ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. जे लोकं नियमित पाणी पितात, त्यांच्या चेहऱ्यावर मुरुमांचे डाग, सुरकुत्या, फाईन लाईन्स दिसून येत नाही. पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते आणि त्वचा निरोगी राहते.

केसांना लवंगांचे पाणी लावण्याचे ३ फायदे, केसांना येईल चमक-केस गळणेही थांबेल लवकर

४. फेस मसाज

रात्रीच्या वेळेस कोणत्याही तेलाने चेहऱ्यावर मसाज करा. चेहऱ्यावर मसाज केल्याने त्वचेतील रक्त प्रवाह वाढतो. रक्ताभिसरण वाढल्यामुळे, त्वचेच्या पेशींना आवश्यक ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वे मिळतात. ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.

५. पुरेशी झोप

चांगली झोप न मिळाल्याने तणाव वाढतो, ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. शरीराला झोप ही महत्वाची. निदान ७ ते ८ तासांची तरी शरीराला झोप आवश्यक आहे. जेव्हा आपण गाढ झोपतो, तेव्हा शरीराची दुरुस्ती होते. रात्री झोपतानाही त्वचा बरी होते.

Web Title: 5 Rules For Younger Skin After 40

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.