Join us
Daily Top 2Weekly Top 5

चेहरा पिंपल्सनी भरण्याची ५ कारणं, कपाळावर कायम पुरळ-जाडजूड फोड येतात म्हणजे ‘ही’ आहे खरी समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2026 14:43 IST

5 reasons why your face is full of pimples, if you constantly get pimples on your forehead, this is the real problem : कपाळावर सारखे पिंपल्स येतात त्याचे कारण जाणून घ्या.

पिंपल्स येणे हे अगदी सामान्य आहे. खास म्हणजे महिलांना चेहऱ्यावर असे पुरळ सारखे येते. त्यामागे अनेक कारणे असतात. पण बरेचदा कपाळ पुरळाने भरते. दिसतेही विचित्र आणि फार खाज सुटते. त्यामागे विविध कारणे असतात.  कपाळावर वारंवार पुरळ किंवा पिंपल्स येणे ही समस्या सगळ्यांनाच भेडसावते. (5 reasons why your face is full of pimples, if you constantly get pimples on your forehead, this is the real problem)ही समस्या फक्त त्वचेपुरती मर्यादित नसून शरीरातील अंतर्गत बिघाड, जीवनशैली आणि केसांच्या काळजीशीही संबंधित असते. कपाळाची त्वचा तेलकट असल्याने तिथे छिद्रे लवकर बंद होतात आणि त्यामुळे पिंपल्स वाढण्याची शक्यता जास्त असते.

कपाळावर पिंपल्स येण्यामागे कोंडा हे एक महत्त्वाचे कारण ठरते. टाळूवर कोंडा असल्यास तो कपाळाही परिणाम करतो, घामामुळे वाढतो आणि त्वचेची छिद्रे बंद करतो. यामुळे जंतुसंसर्ग होऊन कपाळावर लहान - मोठे पुरळ येतात. वेळेवर कोंड्यावर उपचार न केल्यास ही समस्या वाढत जाते. अपचन किंवा पचनसंस्थेतील बिघाड हेदेखील कपाळावर पिंपल्स येण्यामागचे प्रमुख कारण आहे. बद्धकोष्ठता, गॅस, आम्लपित्त यांसारख्या तक्रारी असतील तर शरीरातील विषारी घटक बाहेर न पडता त्वचेतून व्यक्त होतात. याचा परिणाम कपाळावर, नाकावर आणि हनुवटीवर पुरळ येण्याच्या स्वरुपात दिसून येतो.

हार्मोन्समध्ये होणारे बदल हेही एक महत्त्वाचे कारण आहे. किशोरावस्था, मासिक पाळीच्या आधी-नंतर, ताणतणाव किंवा झोपेचा अभाव यामुळे हार्मोन्स असंतुलित होतात. त्यामुळे त्वचेतील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात आणि कपाळावर पिंपल्स वाढतात. केसांवर लावलेले तेल, जेल, स्प्रे किंवा क्रीम कपाळावर येणे हेदेखील पिंपल्स वाढवते. अशा उत्पादनांतील रसायने त्वचेची छिद्रे बंद करतात. तसेच केस सतत कपाळावर येत असतील किंवा हेल्मेट, टोपी, बँड यांचा जास्त वापर असेल तर घाम आणि घाण साचून पुरळ वाढते. अस्वच्छता, वारंवार कपाळाला हात लावणे, घाणेरडे उशीचे कव्हर किंवा टॉवेल वापरणे यामुळेही जंतुसंसर्ग होऊन पिंपल्स येऊ शकतात. यासोबतच जास्त तेलकट, मसालेदार, फास्ट फूड आणि साखरयुक्त आहार घेतल्यास त्वचेतील तेलाचे प्रमाण वाढते. त्यामुळे कपाळावर असलेल्या पुरळाला नख लाऊन ते काढू नका. त्यावर योग्य उपाय करा.  

English
हिंदी सारांश
Web Title : Forehead acne causes: Dandruff, digestion, hormones, and hygiene are key.

Web Summary : Forehead pimples are often due to dandruff, poor digestion, hormonal changes, or hygiene issues. Oil, sweat, and hair products clog pores, leading to breakouts. Avoid touching your face and maintain cleanliness.
टॅग्स :ब्यूटी टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडीत्वचेची काळजी