आपल्या त्वचेवर कधी कधी लांबट, फिकट गुलाबी, जांभळे किंवा पांढरे वळणदार रेघांसारखे डाग दिसतात. यांनाच आपण स्ट्रेचमार्क्स किंवा मराठीत त्वचेवरील ताणरेषा म्हणतो. (4 ways to reduce stretch marks on the stomach and thighs, even sagging skin will become strong and firm)हे डाग विशेषतः पोटावर, मांड्यांवर, कंबरेवर, छातीवर किंवा हातांवर दिसतात. जरी हे त्रासदायक वाटले तरी ते एक सामान्य शारीरिक बदल आहे, आजार नाही. अगदी सामान्य आणि नैसर्गिक गोष्ट आहे.
स्ट्रेचमार्क येण्याचं मुख्य कारण म्हणजे त्वचेवर पडणारा ताण. त्वचा कोणत्याही कारणाने ताणली गेली ती असे डाग दिसतात. जेव्हा त्वचेची आतील थर ताणला जातो, तेव्हा कोलाजेन आणि इलास्टिन हे प्रथिने दूर जातात. यामुळे त्वचा पूर्वीसारखी लवचिक राहात नाही आणि तिथे रेघा उमटतात. गर्भधारणेनंतर महिलांना स्ट्रेचमार्क जास्त येतात. तसेच अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे, किशोरवयातील वाढ, हार्मोनल बदल, किंवा स्टेरॉइड्सचे औषध वापरणे ही काही प्रमुख कारणं मानली जातात. अनेक कारणांमुळे स्ट्रेच मार्क येतात.
त्वचेला पोषण मिळालं नाही, पाणी कमी प्यायलं, किंवा जीवनसत्व अ आणि ई यांची कमतरता झाली तरी त्वचा नाजूक होते आणि स्ट्रेचमार्क्स सहज पडतात. ते जाणवत नाहीत. तसेच पटकन दिसूनही येत नाहीत. पण काहीवेळा त्यांची तीव्रता जास्त असते. ते जास्त दिसून येतात.
हे डाग एकदम नाहीसे करणे अवघड असते, पण ते कमी दिसायला नक्की मदत करता येते. नियमित मॉइश्चरायझिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. कोको बटर, शिया बटर, जीवनसत्तव इ असलेले तेल, बदाम किंवा ऑलिव्ह तेलाने मालीश केल्यास त्वचेची लवचिकता वाढते. कोरफडीचे जेल लावल्याने त्वचेला ओलावा मिळतो आणि रेघा हलक्या होतात. पाणी भरपूर पिणं, फळं, सुका मेवा आणि हिरव्या भाज्या यांचा आहारात समावेश केल्यानेही त्वचेचे आरोग्य सुधारते. काही वेळा डॉक्टरांच्या सल्ल्याने रेटिनॉइड क्रीम्स किंवा लेझर थेरपी वापरली जाते, पण हे उपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावेत.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेचमार्क्स हे नैसर्गिक आहेत. ते शरीराच्या वाढीचा, मातृत्वाचा किंवा आयुष्यातल्या बदलांचा एक भाग आहेत. म्हणून त्यांना त्रुटी समजण्याऐवजी शरीराचा भाग म्हणून पाहणं गरजेचं आहे. प्रत्येक रेघ तुमच्या अनुभवाची खूण आहे आणि ती तुमचं सौंदर्य कमी करत नाही, तर अधिक वास्तविक करते. त्यामुळे स्ट्रेचमार्क असतील आणि कमीही होत नसतील तर काहीही फरक पडत नाही.
