आजकाल अनेक प्रकारचे ब्यूटी प्रॉडक्ट्स मिळतात. मात्र नैसर्गिक सौंदर्य मिळवण्यासाठी घरगुती उपाय सगळ्यात योग्य असतात. आजही अनेक घरांमध्ये मुलतानी मातीचा वापर केला जातो. (3 ways to apply multani mitti - skin becomes beautiful and nourished, must try face packs )ही माती त्वचेतील अशुद्धता दूर करुन चेहऱ्याला स्वच्छ आणि उजळ करतात. विशेष म्हणजे ही एक नैसर्गिक थंडावा देणारी माती आहे. त्यामुळे फक्त त्वचा स्वच्छ होत नाही तर ती जास्त पोषणही मिळते.
मुलतानी मातीत सिलिका, मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयर्न ऑक्साईड यांसारखी खनिजे असतात. ही खनिजे त्वचेला पोषण देतात आणि तिचा तजेलदारपणा टिकवून ठेवतात. सिलिका त्वचेतील तेलाचे प्रमाण नियंत्रित करते, तर मॅग्नेशियम आणि कॅल्शियम त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. यातील अँटीसेप्टिक गुणधर्मामुळे मुरुम, काळे डाग आणि त्वचेवरील जीवाणूंपासून संरक्षण मिळते. मुलतानी माती नियमित वापरल्यास त्वचेला स्वच्छ, उजळ आणि मऊपणा येतो. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल आणि घाण शोषून घेऊन ती रोमछिद्रे स्वच्छ करते. त्यामुळे मुरुमांचे प्रमाण कमी होते आणि त्वचेचा रंग उजळतो. तसेच ही माती उन्हामुळे झालेला टॅनही कमी करते.
मुलतानी माती वापरण्याच्या काही सोप्या आणि प्रभावी पद्धती आहेत. सर्वात सोपी पद्धत म्हणजे मुलतानी मातीमध्ये गुलाबपाणी मिसळून लावणे. हा पॅक त्वचेला थंडावा देतो आणि चेहरा ताजेतवाना करतो. दुसरी पद्धत म्हणजे मुलतानी मातीमध्ये दही आणि थोडे मध मिसळणे. ही पद्धत कोरड्या त्वचेसाठी उत्तम असून त्वचेला ओलावा आणि मऊपणा देते. तिसरी पद्धत म्हणजे मुलतानी मातीमध्ये लिंबाचा रस मिसळून वापरणे. हा पॅक तेलकट आणि मुरुमयुक्त त्वचेसाठी उपयुक्त आहे. मात्र लिंबू त्वचेला लावणे सगळ्यांनाच सहन होत नाही. त्यामुळे आधी त्वचेचा पोत जाणून घ्या मगच हा उपाय करा.
मुलतानी माती आठवड्यातून दोन वेळा वापरावी. ती जास्त वेळ चेहऱ्यावर ठेवू नये, कारण त्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते. वापरानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून हलके मॉइश्चरायझर लावावे. एकंदरीत, मुलतानी माती हा एक नैसर्गिक आणि सुरक्षित सौंदर्य उपाय आहे. ती त्वचेला पोषण देऊन उजळ, स्वच्छ आणि निरोगी ठेवते. त्यामुळे केमिकलयुक्त उत्पादनांपेक्षा मुलतानी मातीचा वापर अधिक फायदेशीर ठरतो.
Web Summary : Multani Mitti cleanses and nourishes skin with minerals. Use with rose water for cooling, yogurt for dry skin, or lemon for oily skin. Apply twice weekly for a radiant complexion. It's a natural beauty solution.
Web Summary : मुल्तानी मिट्टी त्वचा को साफ और खनिज पदार्थों से पोषित करती है। ठंडक के लिए गुलाब जल, रूखी त्वचा के लिए दही या तैलीय त्वचा के लिए नींबू के साथ प्रयोग करें। चमकदार रंगत के लिए हफ्ते में दो बार लगाएं। यह एक प्राकृतिक सौंदर्य समाधान है।