Join us  

Holi 2024 : होळी खेळण्याआधी त्वचेवर लावा ३ प्रकारचे तेल; केस आणि त्वचेवर करेल सरंक्षण कवचाप्रमाणे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2024 12:42 PM

3 oils to protect your skin on Holi : कितीही रंगात खेळा; त्वचेवर रंग टिकणार नाही-फक्त खेळण्यापूर्वी त्वचेवर ३ गोष्टी लावा..

होळी म्हणजे रंगाचा सण; पुरणपोळीचा बेत आणि आनंदी-आनंद (Holi 2024). २५ मार्च रोजी सर्वत्र धुलीवंदन साजरा करण्यात येईल. काही ठिकाणी धुलीवंदन तर काही रंगपंचमीनिमित्त रंग खेळून सण साजरा करतील. बाजार देखील विविध रंगानी सजला आहे. पण सध्या मार्केटमध्ये रासायनिक रंगांचा खप वाढत चालला आहे. त्यामुळे नैसर्गिक कोणते आणि रसायनयुक्त रंग कोणते? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल (Skin Care Tips).

आपण कोणाला रंग लावू नका म्हणून रोखू नाही शकत. पण रंग लावण्यापूर्वी आपण स्किनची नक्कीच काळजी घेऊ शकता. त्वचेवर लावलेला रंग निघावा, शिवाय लावलेला रंगांमुळे इन्फेक्शन होऊ नये, यासाठी रंगपंचमी खेळण्यापूर्वी त्वचेवर ३ प्रकारचे तेल लावा (Hair Care Tips). यामुळे स्किनवर रासायनिक रंगांचा दुष्परिणाम होणार नाही. आपण मनसोक्त होळी खेळू शकता(3 oils to protect your skin on Holi).

खोबरेल तेल

होळीच्या रासायनिक रंगांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी आपण खोबरेल तेलाचा वापर करू शकता. खोबरेल तेलात अत्यावश्यक फॅटी ऍसिड आणि जीवनसत्त्वे आढळतात. जे केस आणि त्वचेच्या पोर्समध्ये जाऊन पोषण आणि संरक्षण करतात. खोबरेल तेल त्वचेला मॉइश्चरायझ करून रंगांच्या दुष्परिणामांपासून संरक्षण करते. शिवाय आपण याच्या वापराने होळीचे रंग सहज काढू शकता. यासाठी होळी खेळण्याच्या १५ मिनिटापूर्वी केस आणि त्वचेला तेल लावा.

पुरण सैल-पोळी लाटताना फाटते? शेफ विष्णू मनोहर सांगतात खास ६ टिप्स; पुरणपोळी होतील परफेक्ट-चविष्ट

बदाम तेल

होळीला बाहेर खेळण्यापूर्वी बदाम तेल लावा. त्यात व्हिटॅमिन ई आणि फॅटी ऍसिड आढळतात. जे मॉइश्चरायझिंग करण्यासाठी प्रभावी ठरतात. रासायनिक रंगामुळे केस आणि त्वचेचे नुकसान होऊ नये म्हणून होळी खेळण्याच्या १५ मिनिटापूर्वी तेल लावायला विसरू नका.

महागडे हेअर टॉनिक कशाला? उकळत्या पाण्यात कांद्यासह मिसळा २ गोष्टी; केस गळती विसराल कायमची

मोहरीचे तेल

जर आपल्याकडे खोबरेल तेल आणि बदमाचे तेल उपलब्ध नसेल तर, आपण मोहरीच्या तेलाचा वापर करू शकता. होळी खेळण्यापूर्वी केस आणि त्वचेवर मोहरीचे तेल लावल्याने फायदा होतो. यामध्ये असलेले व्हिटॅमिन आणि ओमेगा फॅटी ॲसिड त्वचा आणि केस सुरक्षित ठेवण्यास मदत करते. शिवाय रंगांमध्ये उपस्थित असलेल्या रसायनांचा प्रभाव देखील कमी करतो.

टॅग्स :होळी 2024ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीकेसांची काळजी