lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > महागडे हेअर टॉनिक कशाला? उकळत्या पाण्यात कांद्यासह मिसळा २ गोष्टी; केस गळती विसराल कायमची

महागडे हेअर टॉनिक कशाला? उकळत्या पाण्यात कांद्यासह मिसळा २ गोष्टी; केस गळती विसराल कायमची

Onion hair tonic for hair growth : केसांचं वाढेल सौंदर्य-दिसतील काळेभोर; फक्त आठवड्यातून दोनदा या हेअर टॉनिकचा वापर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2024 10:30 AM2024-03-23T10:30:01+5:302024-03-24T10:34:07+5:30

Onion hair tonic for hair growth : केसांचं वाढेल सौंदर्य-दिसतील काळेभोर; फक्त आठवड्यातून दोनदा या हेअर टॉनिकचा वापर करा

Onion hair tonic for hair growth | महागडे हेअर टॉनिक कशाला? उकळत्या पाण्यात कांद्यासह मिसळा २ गोष्टी; केस गळती विसराल कायमची

महागडे हेअर टॉनिक कशाला? उकळत्या पाण्यात कांद्यासह मिसळा २ गोष्टी; केस गळती विसराल कायमची

केस म्हणजे सौंदर्य (Hair Growth). केसांमुळे चेहऱ्याची शोभा वाढते. पण बिघडलेली जीवनशैली, योग्य आहार न घेणं आणि केसांची योग्य निगा न राखणं यामुळे केस कमकुवत होतात. आजच्या काळात प्रत्येक जण केस गळतीला वैतागला आहे. महागडे हेअर ट्रिटमेण्ट आणि विविध उत्पादनांमुळे केसांचे आरोग्य धोक्यात येत आहे. पण ब्यूटी पार्लरमध्ये खर्च करण्यापेक्षा आणि केमिकल उत्पादनांचा वापर न करता घरातच हेअर टॉनिक (Hair Tonic) तयार करू शकता.

या हेअर टॉनिकमुळे केसांची वाढ तर होईल, शिवाय नव्या केस काळेभोर दिसतील (Hair Care). पण हे हेअर टॉनिक कसे तयार करायचे? या हेअर टॉनिकचा वापर कसा करावा? पाहूयात(Onion hair tonic for hair growth).

माधुरी दीक्षितचं पाहा सिक्रेट, सुंदर केसांसाठी सोपा उपाय- एक केळं आणि..

हेअर टॉनिक कसे तयार करायचे?

सर्वप्रथम, एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात सालीसकट कांदा, ४ चमचे मेथी दाणे, आणि ५ ते ८ कडीपत्त्याची पानं घाला. मध्यम आचेवर गॅस ठेवा. ५ मिनिटासाठी साहित्य शिजवून घ्या. ५ मिनिटानंतर गॅस बंद करा. ग्लासवर गाळणी ठेवा, त्यात पाणी गाळून घ्या. अशा प्रकारे हेअर टॉनिक वापरण्यासाठी रेडी. थंड झाल्यानंतर आपण हे टॉनिक एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेऊ शकता.

घरीच पार्लरसारखं पेडीक्युअर करता येते? टोमॅटो-लिंबाचा सोपा उपाय; टॅनिंग निघेल-पाय चमकतील..

हेअर टॉनिकचा वापर कधी करावा?

केस धुण्यापूर्वी आपण या हेअर टॉनिकचा वापर करू शकता. यासाठी केस विंचरून घ्या. केस धुण्याच्या ५ तास आधी केसांच्या मुलांना हे हेअर टॉनिक लावा. मेथी दाणे, कांदा आणि कडीपत्यातील गुणधर्म केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतील. आपण या हेअर टॉनिकचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. 

Web Title: Onion hair tonic for hair growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.