रावसाहेब दानवेंच्या गावकडची गोष्ट, रस्त्यातच बसून भोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 12:42 PM2021-12-23T12:42:45+5:302021-12-23T13:05:36+5:30

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेलं जवखेडा खुर्द हे रावसाहेब दानवे यांचे मूळ गाव आहे. याच मतदारसंघातून ते खासदारही बनले आहेत. त्यामुळेच, आपल्या मतदारसंघात भाषण करताना त्यांचा गावरान, आपलेपणा अनेकांना आपलासा वाटतो.

केंद्रीयमंत्री रावसाहेब दावने हे दिलखुलास व्यक्तीमत्व म्हणून परिचीत आहेत. आपल्या मतदासंघात असताना केंद्रीयमंत्रीपदाचा रुबाब त्यांच्याजवळ दिसत नाही.

कधी जुन्या मित्रांच्या भेटीगाठीत ते रमतात, तर कधी पत्नीसोबत चुलीवर बेसन भाकरी खातानाचाही फोटो त्यांचा व्हायरल होतो. सामान्य शेतकऱ्याप्रमाणे ते गावाकडं दिसून येतात.

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेलं जवखेडा खुर्द हे रावसाहेब दानवे यांचे मूळ गाव आहे. याच मतदारसंघातून ते खासदारही बनले आहेत. त्यामुळेच, आपल्या मतदारसंघात भाषण करताना त्यांचा गावरान, आपलेपणा अनेकांना आपलासा वाटतो.

रावसाहेब यांचा 30 वर्षांचा राजकीय प्रवास अत्यंत रंजक आहे. त्यांनी गावच्या सरपंचपदापासून ते केंद्रीय मंत्री अशी वाटचाल केली आहे. 1990 ते 1995 आणि 1995 ते 1999 या दोन टर्ममध्ये ते भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते.

रावसाहेब दावने आज देशाचे केंद्रीयमंत्री असतानाही गावाकडं त्यांचा गावकऱ्यांसारखाच साधेपणा असतो. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन गावातील काही फोटो शेअर केले आहेत.

जरा विसावू या वळणावर... धकाधकीच्या जीवनात असे काही क्षण ... कत्याच केलेल्या भोकरदन ते सोयगाव येथील प्रवासादरम्यान पेट पूजा करण्यासाठी व वेळ वाचवण्यासाठी घाटातच निसर्गाच्या सानिध्यात भोजनाचा आनंद लुटला.

दानवे यांनी चक्क रस्त्यात गाडी थांबवून रस्त्यावर गमछा हातरुन जेवणाचा आनंद घेतल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यावरुन, त्यांचा साधेपणा चर्चेत आहे.

जिवा शिवाची बैल जोड़... लाविल पैजंला आपली कुडं.... आयुष्याच्या प्रवासात भक्कम साथ देणाऱ्या सहधर्मचारिणी व त्याचबरोबर माझ्या नातीसोबत गावी असताना बैलगाडीवरून शिवारात फेरफटका मारल्याचाही त्यांनी फोटो शेअर केला आहे.