मुंबईत 'बसंत' बहार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2018 03:27 PM2018-03-09T15:27:45+5:302018-03-09T15:27:45+5:30

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील पूर्व द्रुतगती मार्गावरील छेडा नगर ते विक्रोळी या भागात व विशेष करुन मार्गाच्या मध्यभागी असणा-या दुभाजकावर पर्यावरणाच्या व सुशोभिकरणाच्या दृष्टीकोनातून विविध झाडे लावण्यात आली आहेत.

या झाडांमध्ये 'बसंत रानी' या प्रकारच्या झाडांचाही समावेश आहे. सुमारे २५ ते ३० फुट उंच असणा-या ह्या झाडांना दरवर्षी साधारणपणे वसंत ऋतूत बहर येतो. यावर्षी देखील फुलांनी बहरलेली'बसंत रानी' ची झाडे नागरिकांचे व पुष्पप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहेत.

या झाडांना पाणी देणे व वेळोवेळी आवश्यक ते परिरक्षण करण्याची कामे महापालिकेच्याच उद्यान खात्याद्वारे नियमितपणे केली जातात.

महापालिका क्षेत्रात नुकत्याच झालेल्या वृक्षगणनेनुसार महापालिका क्षेत्रात २९ लाख ७५ हजार २८३ एवढे वृक्ष आहेत.

हिंदी भाषेत 'बसंत रानी' अशी ओळख असणा-या या झाडाचे वनस्पतीय शास्त्रीय नाव 'टॅब्यूबिया पेंटाफायला' (Tabebuia Pentaphylla / Tabebuia Rosea)असे आहे. या झाडाला इंग्रजीमध्ये'पिंक ट्रंम्पेट, पिंक पाऊल, पिंक टिकोमा'या नावांनीही ओळखले जाते.