योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:15 IST2020-12-03T04:15:18+5:302020-12-03T04:15:18+5:30

योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर उद्योजक, गुंतवणूकदारांशी साधणार संवाद लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील गुंतवणूक वाढावी, प्रस्तावित फिल्मसिटी मार्गी ...

Yogi Adityanath on tour in Mumbai | योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर

योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर

योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर

उद्योजक, गुंतवणूकदारांशी साधणार संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील गुंतवणूक वाढावी, प्रस्तावित फिल्मसिटी मार्गी लावण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. आपल्या या दौऱ्यात योगी विविध उद्योजक, औद्याेगिक कंपन्यांचे प्रतिनिधी, सिने तारेतारकांच्या भेटी घेणार आहेत.

योगी आदित्यनाथ विशेष विमानाने मंगळवारी सायंकाळी मुंबईत दाखल झाले. उत्तर प्रदेशमध्ये उद्योजकांनी गुंतवणूक करावी आणि तेथे रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी योगी आदित्यनाथ जोरदार प्रयत्न करीत आहेत. त्यादृष्टीने बुधवारी, दिवसभर भरगच्च कार्यक्रम ठरविण्यात आला आहे. सकाळी मुंबई स्टाॅक एक्सचेंजमध्ये लखनऊ महापालिकेचे बाॅण्ड अधिकृत लिस्टिंगमध्ये सहभागी होणार आहेत. लखनऊ महापालिकेने याच महिन्यात दोनशे कोटींचे बॉण्ड जारी केले होते. लखनऊ महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. यापूर्वी देशातील अन्य दहा महापालिकांनी बॉण्ड जारी केले होते.

यानंतर योगी आदित्यनाथ हे हाॅटेल ट्रायडंट येथे विविध उद्योजकांशी संवाद साधणार आहेत. उत्तर प्रदेशात सत्ता आल्यानंतर भाजपने २०१८ साली इन्व्हेस्टर्स फ्रेंडली हब म्हणून विकास करण्याचे जाहीर केले होते. त्या अनुषंगाने संरक्षणविषयक काॅरिडोरसाठी गुंतवणूकदार, प्रस्तावित फिल्मसिटीतील गुंतवणूकदारांशी चर्चा करणार आहेत. याशिवाय मुख्यमंत्री योगी विविध उद्योजकांशी संवाद साधणार आहेत. यात टाटा सन्सचे एन. चंद्रशेखर, हिरानंदानी ग्रुपचे निरंजन हिरानंदानी, भारत फोर्जचे बाबा कल्याणी, सिमन्सचे सुप्रकाश चौधरी, ‘एल अँड टी’चे एस.एन. सुब्रह्मण्यन, कॅपिटल सर्व्हिसेसचे विकास जैन, याशिवाय संजय नायर, जसपाल बिंद्रा, सुकरन सिंह अशा औद्याेगिक संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. तसेच चित्रपटसृष्टीतील सुभाष घई, बोनी कपूर, भूषण कुमार, जतीन सेठी, राहुल मित्रा, नीरज पाठक, रणदीप हुडा, जिमी शेरगील, तरन आदर्श, कोमल नहाटा, राजकुमार संतोषी आदी मान्यवरांना भेटणार आहेत.

Web Title: Yogi Adityanath on tour in Mumbai