ज्ञानमंदिर शाळेत योगसाधना

By Admin | Updated: June 22, 2015 02:28 IST2015-06-22T02:28:40+5:302015-06-22T02:28:40+5:30

कळंबोली येथील ज्ञानमंदिर शाळेत ‘लोकमत’च्या वतीने रविवारी योग साधनेचे धडे देण्यात आले. या उपक्रमाला कळंबोलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

Yogasadhana in Gyanmandir school | ज्ञानमंदिर शाळेत योगसाधना

ज्ञानमंदिर शाळेत योगसाधना

कळंबोली : कळंबोली येथील ज्ञानमंदिर शाळेत ‘लोकमत’च्या वतीने रविवारी योग साधनेचे धडे देण्यात आले. या उपक्रमाला कळंबोलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भविष्यातही योगसाधना करण्याचा संकल्प या वेळी अनेकांनी केला.
येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित ज्ञानमंदिर शाळेत योग पतंजली योगपीठ, कळंबोली वाहतूक शाखा, अशोक मोटे यांच्या सहकार्याने योगदिन साजरा करण्यात आला. योगशिक्षक गोरक्ष घाडगे, नथुराम तटकरे यांनी उपस्थितांना योगविद्येचे धडे दिले. विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक आणि रहिवासी या कार्यक्र मात सहभागी झाले होते. त्यांनी प्राणायामाबरोबरच विविध योगासने केली. कळंबोली वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनीही खास वेळ काढून योगासने केली व स्वत:ला तणावमुक्त केले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, राष्ट्रीय सेवा संघाचे नंदाजी ओझे, भाजपाप्रणीत भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक मोटे, सामाजिक कार्यकर्ते अरुण भिसे, पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर, नगरसेवक संतोष शेट्टी, शाळा समितीचे अध्यक्ष मिहीर प्रभुदेसाई, डॉ. अंकुर पटवर्धन, मुख्याध्यापक रोहिदास भारमळ, समन्वयक माधवी मतलापूरकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Yogasadhana in Gyanmandir school