'Why am BJP afraid?; 'That' video was 2 years ago but now goes viral Allegation by Nawab Malik | 'भाजपाला माझी भीती का वाटतेय?; 'तो' व्हिडिओ तर २ वर्षापूर्वीचा पण आता व्हायरल केला'

'भाजपाला माझी भीती का वाटतेय?; 'तो' व्हिडिओ तर २ वर्षापूर्वीचा पण आता व्हायरल केला'

ठळक मुद्देमहाराजांबद्दल जयघोष करताना नवाब मलिक मात्र गप्प बसल्याचा व्हिडिओमाझी बदनामी करण्यासाठी भाजपाकडून व्हिडिओ व्हायरल अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी केला आरोप

मुंबई - आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर २ वर्षापूर्वी गेलो होतो, त्यावेळचा हा व्हिडिओ आहे, मात्र भाजपाच्या ग्रुपमधून हा व्हिडिओ व्हायरल करुन माझी बदनामी करण्यात येत आहे असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. मलिकांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली होती. 

याबाबत नवाब मलिक म्हणाले की, 2 वर्षापूर्वीचा तो व्हिडिओ आहे, भाजपाकडून हा व्हिडिओ व्हायरल करुन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न आहे, भाजपाला माझ्यापासून एवढी भीती का वाटते? आम्ही रायगड किल्ल्यावर गेलो होतो, तेव्हा सगळे नेते होते, तेव्हा धनंजय मुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यावेळी गर्दी असल्याने मला हात उचलता आला नाही, पण मी तोंडाने जय बोललो असं नवाब मलिकांनी स्पष्ट केले आहे. 

रायगड किल्ल्यावरील या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार अवधुत तटकरे, विद्या चव्हाण आणि माजी मंत्री फौजिया खानही उपस्थित आहेत. यामध्ये धनंजय मुंडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असताना यात नवाब मलिक मात्र गप्प बसल्याचं दिसत आहे. अजित पवारांसह अन्य जण शिवरायांच्या नावाने जय म्हणताना दिसत आहे. त्यामुळे शिवप्रेमींनी या व्हिडिओ पोस्ट करुन नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता.

याबाबत मनसेचे अमेय खोपकर यांनी ट्विट केलं आहे की, आमचे असंख्य मुस्लीम बांधव आहेत, ज्यांच्यासमोर कुणी छत्रपती शिवाजी महाराज की, असं ओरडलं तरी ते आनंदाने जय अशी गर्जना करतात. मग या नवाब मलिकांना इतकी मग्रुरी का? महाराजांचा जयजयकार करण्यात याला कमीपणा वाटतो का? असा सवाल उपस्थित करण्यात केला आहे. तसेच अशा प्रवृत्तीच्या माणसाने राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदावर राहावं हे तुम्हाला पटतं का? या पक्षाचे अध्यक्ष आहेत ज्यांना त्यांचे समर्थक डायरेक्ट 'जाणता राजा' संबोधतात, त्या शरद पवारांना तरी असा माणूस कसा चालतो? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसला विचारण्यात आला होता. 

महत्त्वाच्या बातम्या

भाजपाच्या 'त्या' दाव्यात तथ्य?; शरद पवारांनी राज ठाकरेंबद्दल केलं मोठं विधान, म्हणाले... 

काँग्रेसचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सल्ला; सीएएवर जाहीर बोलण्यापूर्वी नीट समजून घ्या, अन्यथा...

नवाब मलिकांच्या 'त्या' व्हिडिओवरुन शिवप्रेमींमध्ये संताप; मनसेनेही विचारला राष्ट्रवादीला सवाल 

'त्या' तरुणीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; मी एकटी नाही, फक्त चेहरा आहे माझ्यामागे तर...

...म्हणून सरकार ५ वर्ष चालेल; शरद पवारांनी सांगितला बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमधील फरक

English summary :
Minister Nawab Malik allegation on BJP, The Video of Chhatrapati Shivaji Maharaj slogan is viral from BJP Group

Web Title: 'Why am BJP afraid?; 'That' video was 2 years ago but now goes viral Allegation by Nawab Malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.