भाजपाच्या 'त्या' दाव्यात तथ्य?; शरद पवारांनी राज ठाकरेंबद्दल केलं मोठं विधान, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 12:48 PM2020-02-22T12:48:43+5:302020-02-22T12:55:18+5:30

Sharad Pawar: राज ठाकरेंबद्दल मतभेद असतील पण आमच्यात मनभेद नाही, सुसंवाद आहे

Facts on BJP's 'claim'? Sharad Pawar made a big statement about Raj Thackeray, saying ... | भाजपाच्या 'त्या' दाव्यात तथ्य?; शरद पवारांनी राज ठाकरेंबद्दल केलं मोठं विधान, म्हणाले... 

भाजपाच्या 'त्या' दाव्यात तथ्य?; शरद पवारांनी राज ठाकरेंबद्दल केलं मोठं विधान, म्हणाले... 

googlenewsNext
ठळक मुद्देतीन पक्षाचं सरकार आल्यानंतर विरोधी पक्ष म्हणून पोकळी निर्माण झाली ही पोकळी भाजपा भरुन काढेल की मनसे हे येणाऱ्या काळात ठरेलशरद पवारांनी राज ठाकरेंबाबत केले मोठं विधान

मुंबई - महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आलं. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात जवळीक निर्माण झाली. पण निवडणुकीपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शरद पवार एकत्र येतील. मनसे आघाडीत सहभागी होईल अशी चर्चा सुरु होती. मात्र निवडणुकीत मनसे आघाडीत सहभागी झाली नसली तरी काही मतदारसंघात मनसेला पुरक होईल अशी भूमिका शरद पवारांनी घेतली होती. 

राज्यात बदललेल्या समीकरणानंतर शरद पवार यांच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंनी राज्यात मुख्यमंत्रिपद घेतलं, त्यामुळे राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात दुरावा निर्माण झाला का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका स्वीकारत पक्षाच्या भगव्या रंगाचा नवा झेंडा आणला त्यावर राष्ट्रवादीने टीका केली होती. 

एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी पुन्हा राज ठाकरेंवर भाष्य केलं. राज ठाकरेंना समर्थन देणारा मोठा वर्ग आहे, पण तो प्रतिसाद मतांमध्ये परिवर्तित होतो का? याबाबत शंका आहे, राज ठाकरेंची मते जाणून घेण्यासाठी लोकं उत्सुक असतात असं त्यांनी सांगितले. 

पण त्याचसोबत राज ठाकरेंबद्दल मतभेद असतील पण आमच्यात मनभेद नाही, सुसंवाद आहे. आजही आमचं बोलणं होत असतं, राजकारणात एक पोकळी असते, तीन पक्षाचं सरकार आल्यानंतर विरोधी पक्ष म्हणून पोकळी निर्माण झाली आहे. विरोधाची पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न मनसे करतेय, त्यामुळे ही पोकळी भाजपा भरुन काढेल की मनसे हे येणाऱ्या काळात ठरेल असं शरद पवारांनी सांगितले. 

दरम्यान, रिमोट माझ्या हातात नाही, आम्ही सरकार उभं केलं आहे, विचारल्याशिवाय मत द्यायचं नाही ही माझी भूमिका आहे, तर राज्याच्या हिताबाबत काही सूचना द्यायचा असेल तर पक्षाच्या अंतर्गत चर्चा होते. केंद्र सरकारच्या बाबतीत महाराष्ट्राची भूमिका मांडायची असेल तर सगळेच एकत्र येतो. मार्क देण्यासाठी परीक्षेची वेळ आली नाही, पण उद्धव ठाकरेंचा मार्ग योग्य आहे असं सांगत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचे कौतुक केले.  

भाजपाने केला होता शरद पवारांवर आरोप
मनसेच्या बदललेल्या झेंड्यामागे वेगळंच राजकारण असल्याचं भाजपा नेते गणेश हाके म्हटले होते. 'या सगळ्यामागे शरद पवारांचं डोकं आहे. शिवसेना सत्तेसाठी हिरवी झाली आहे. त्यामुळे हिंदूंची एकगठ्ठा मतं आता भाजपाकडे जाऊ शकतात. याच मतांचं विभाजन करण्यासाठी मनसेनं त्यांचा झेंडा बदलला आहे. या सगळ्यामागे शरद पवारांचा हात आहे. त्यांच्याकडूनच मनसे प्रमुख राज ठाकरेंना प्रोत्साहन दिलं जात आहे,' असा दावा हाकेंनी केला होता. 

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सल्ला; सीएएवर जाहीर बोलण्यापूर्वी नीट समजून घ्या, अन्यथा...

...म्हणून सरकार ५ वर्ष चालेल; शरद पवारांनी सांगितला बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमधील फरक

शरद पवारांनी शेतकऱ्यांना दिला घर चालवण्याचा वेगळा 'मंत्र'

'त्या' तरुणीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; मी एकटी नाही, फक्त चेहरा आहे माझ्यामागे तर... 

संपूर्ण देशात एनआरसी लागू न करण्याचे मोदींनी आश्वासन दिले : उद्धव ठाकरे

Web Title: Facts on BJP's 'claim'? Sharad Pawar made a big statement about Raj Thackeray, saying ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.