Vidhan Sabha 2019: Prakash Mehta's workout while getting his seventh nomination | Vidhan Sabha 2019: सातव्यांदा उमेदवारी मिळविताना प्रकाश मेहतांची कसरत
Vidhan Sabha 2019: सातव्यांदा उमेदवारी मिळविताना प्रकाश मेहतांची कसरत

- जमीर काझी 

मुंबई : महानगरातील भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या घाटकोपर(पूर्व) विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री व विद्यमान आमदार प्रकाश मेहता हे सलग सातव्यांदा उमेदवारी मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. वादग्रस्त प्रतिमेमुळे त्यांना डावलून नवा चेहरा द्यावा, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांतून होत आहे. त्यामुळे मेहता यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत, तर प्रकाश मेहता यांनी आपला नसेल, तर पुत्र हर्ष यांला उमेदवारी द्यावी, यासाठी टोकाचे प्रयत्न करीत आहेत.

घाटकोपर(पूर्व) विधानसभा मतदारसंघात गुजराती मताचे प्राबल्य असल्याने, भाजप आणि काँग्रेसकडून याच समाजातील उमेदवार दिला जाईल, हे निश्चित आहे. भाजपचा वरचष्मा असलेल्या या मतदारसंघात मेहता यांची पुन्हा एकदा आमदार व्हायची इच्छा आहे. मात्र,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनातून उतरले असल्याने, त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर आहे. मेहता यांना त्याची कल्पना असल्याने त्यांनी पुत्र हर्ष यांचे नाव पुढे केले आहे. मात्र, भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी घराणेशाहीला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे पक्ष खरेच नवा चेहरा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


Web Title: Vidhan Sabha 2019: Prakash Mehta's workout while getting his seventh nomination
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.