वसई पूर्वेत चोरांच्या भीतीने दहशत

By Admin | Updated: December 26, 2014 23:03 IST2014-12-26T23:03:12+5:302014-12-26T23:03:12+5:30

वाडा, शहापूर, भिवंडी या तालुक्यामध्ये चोरांच्या भीतीने नागरीक दहशतीत असताना आता वसई पूर्व भागात सुद्धा तिल्हेर, माजीवली

Vasai Puravai feared fear of thieves | वसई पूर्वेत चोरांच्या भीतीने दहशत

वसई पूर्वेत चोरांच्या भीतीने दहशत

पारोळ : वाडा, शहापूर, भिवंडी या तालुक्यामध्ये चोरांच्या भीतीने नागरीक दहशतीत असताना आता वसई पूर्व भागात सुद्धा तिल्हेर, माजीवली या गावात चोर शिरल्याने नागरीकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
बुधवारी रात्री तिल्हेर येथील एका घरात चोरांनी घुसून घर लुटण्याचा प्रयत्न केला पण घरात असलेल्या महिलांनी आरडाओरड केल्यामुळे चोर पळून गेले. लगेच त्या गावातील गावकऱ्यांनी रात्रभर चोराचा शोध घेतला पण चोर फरारी झाले.या घटनेनंतर या भागात भीतीचे वातावरण असल्याचे तिल्हेरचे पोलीस पाटील रामदास बुरूड यांनी सांगितले. तसेच हा परिसर जंगलाने व्यापलेला असल्यामुळे चोरीची भीती या भागात जास्त आहे. त्यामुळे या भागात पोलिसी गस्त वाढवण्याची मागणी त्यांनी केली.
त्याचप्रमाणे मांडवी दूरक्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तिथे पोलीस बल अपुरे आहे. त्यामुळे ग्रामरक्षा कमिटीचे तरूण चोरावर नजर ठेवून असून अफवांवर नागरीकांना विश्वास ठेवू नये, असे मांडवी पोलीस सहाय्यक निरिक्षक जंगम यांनी सांगितले. चोरांमुळे आमच्यामध्ये भिती पसरली असून हे चोर घरातील दागदागिने, लहान मुले, पैसा यांना लक्ष्य करीत असल्याच्या वार्ता येत असल्याने चोरांच्या भीतीमुळे आम्हाला रात्रभर जागे राहावे लागते असे माजीवलीचे नागरीक कमलाकर पारधी यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: Vasai Puravai feared fear of thieves