Omicron Variant: ओमायक्रॉन व्हेरिएंटला रोखण्याचा एकच मार्ग; टास्क फोर्सनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगितला उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 10:04 PM2021-11-28T22:04:20+5:302021-11-29T17:03:52+5:30

दुसऱ्या लाटेस कारणीभूत असलेल्या डेल्टाचे दोन म्युटेशन होते. बेटा प्रकाराचे तीन म्युटेशन होते पण ओमायक्रॉन या प्रकाराचे पन्नासहून अधिक म्युटेशन आहेत

Use Double Mask is Only way to block the Omicron variant, Task force told CM Uddhav Thackeray | Omicron Variant: ओमायक्रॉन व्हेरिएंटला रोखण्याचा एकच मार्ग; टास्क फोर्सनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगितला उपाय

Omicron Variant: ओमायक्रॉन व्हेरिएंटला रोखण्याचा एकच मार्ग; टास्क फोर्सनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगितला उपाय

Next

मुंबई – दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे(Omicron Variant) अनेकांची चिंता वाढली आहे. डेल्टापेक्षा वेगाने संक्रमित करणारा ओमीक्रॉन व्हेरिएंट अवघ्या काही दिवसांत जगातील ११ देशात पसरला आहे. या घातक व्हेरिएंटने अनेक देशांची झोप उडवली आहे. त्यामुळे भारतानेही ओमीक्रॉन व्हेरिएंटबाबत सतर्कता बाळगत योग्य ती पाऊलं उचलण्यास तयारी केली आहे. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी टास्क फोर्सच्या सदस्यांसोबत बैठक घेतली.

या बैठकीत टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर(Uddhav Thackeray) काही पर्याय ठेवले आहे. जेणेकरून महाराष्ट्रात हा व्हेरिएंट जास्त पसरू नये. ओमीक्रॉन व्हेरिएंट का घातक आहे? याबाबत टास्क फोर्सचे डॉ. शशांत जोशी यांनी बैठकीत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. कोविडच्या या नव्या विषाणूने दक्षिण आफ्रिकेतील यापूर्वीच्या डेल्टा व्हेरिएंट प्रकाराची जागा घेतली असून त्याचा संसर्ग कितीतरी अधिक आहे. डेल्टाची जागा ओमीक्रॉनने अवघ्या दोन आठवड्यात घेतली यावरून त्याची घातकता लक्षात येते असं त्यांनी सांगितले आहे.

तसेच दुसऱ्या लाटेस कारणीभूत असलेल्या डेल्टाचे दोन म्युटेशन होते. बेटा प्रकाराचे तीन म्युटेशन होते पण ओमायक्रॉन या प्रकाराचे पन्नासहून अधिक म्युटेशन आहेत. हा व्हेरिएंट सध्याच्या औषधांना, लसीला दाद देतो किंवा नाही ते डॉक्टर्स आणि तज्ञ जाणून घेत आहेत. पण घाबरून न जाता आपण काळजी घेण्याची गरज आहे कारण याचा संसर्गाचा वेग पूर्वीच्या डेल्टापेक्षा कितीतरी जास्त आहे असं डॉ. शशांक जोशींनी म्हटलं आहे.

दरम्यान, डबल मास्क घालणे योग्य राहील. सर्जिकल ३ प्लाय मास्क आणि एन ९५ प्रकारातील एक मास्क घालणे उचित ठरेल. खाताना किंवा जेवताना जेव्हा मास्क काढलेला असेल तेच अधिक संधानात बाळगणे गरजेचे आहे. अनावश्यक गर्दी टाळा, आवश्यक असेल तरच प्रवास करा. ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी ती त्वरित घ्यावी. ओमायक्रॉनला रोखण्याचा एकच मार्ग आहे. दुहेरी मास्क घाला, मोकळ्या हवेत राहा, आणि लसींचे दोन्ही डोस घ्या असे उपाय टास्क फोर्सनं मुख्यमंत्र्यासमोर बैठकीत मांडले आहेत.

बैठकीच्या प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ही बैठक बोलविण्यामागे संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे सांगितले. डॉ प्रदीप व्यास यांनी सादरीकरण करून युरोप तसेच दक्षिण आफ्रिकेत वेगाने पसरणाऱ्या विषाणूविषयी माहिती दिली. यावेळी टास्क फोर्सच्या डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी व डॉ राहुल पंडित यांनी देखील यासंदर्भात काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन केले.

संबंधित बातम्या

'कुछ नही होता यार' हे अजिबात चालणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बजावलं

लॉकडाऊन नको असेल तर...;‘ओमीक्रॉन’ संकटावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सतर्कतेचा इशारा

Web Title: Use Double Mask is Only way to block the Omicron variant, Task force told CM Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.