नवी मुंबईतून दोनशे किलो गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:29 IST2021-02-05T04:29:45+5:302021-02-05T04:29:45+5:30

चौघांना अटक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) पथकाने गुरुवारी नवी मुंबईत ठिकठिकाणी ...

Two hundred kilos of cannabis seized from Navi Mumbai | नवी मुंबईतून दोनशे किलो गांजा जप्त

नवी मुंबईतून दोनशे किलो गांजा जप्त

चौघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) पथकाने गुरुवारी नवी मुंबईत ठिकठिकाणी छापेमारी करून सुमारे दोनशे किलो गांजा जप्त केला. नेरूळ येथील एका हाउसिंग सोसायटीतील दोन फ्लॅटवर छापे टाकून चौघांना अटक केली.

गेल्या आठवड्यात एनसीबीने ड्रग्ज तस्कर चिकू पठाणला घणसोली येथून अटक केल्यानंतर राज्यात विविध ठिकाणी कारवाईचा धडाका सुरू आहे. दक्षिण मुंबईतील डोंगरी, पुण्यातील खडकवासला, भिवंडी परिसरात छापे टाकून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले. गुरुवारी सकाळी एनसीबीचे एक पथक दोन वाहनांतून नेरूळ येथील सायलेंट व्हॅली हाउसिंग सोसायटीमध्ये पोहोचले. ३० नंबरच्या इमारतीमधील दोन फ्लॅटवर छापे टाकले. तेथे बेडरूममध्ये लपविलेला गांजा जप्त केला. त्याचवेळी याच परिसरातील अन्य दोन ठिकाणी झडती घेण्यात आली. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली. त्याच्याकडे चौकशी करण्यात येत आहे.

..........................

Web Title: Two hundred kilos of cannabis seized from Navi Mumbai