छेडछाडीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

By Admin | Updated: November 4, 2015 03:44 IST2015-11-04T03:44:22+5:302015-11-04T03:44:22+5:30

परिसरातील टपोरी मुलांकडून होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून वडाळ्यात एका १९ वर्षीय तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तत्काळ तिला रुग्णालयात दाखल केल्याने तिचा जीव वाचला

Tried to commit suicide in tears | छेडछाडीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

छेडछाडीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई: परिसरातील टपोरी मुलांकडून होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून वडाळ्यात एका १९ वर्षीय तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तत्काळ तिला रुग्णालयात दाखल केल्याने तिचा जीव वाचला आहे. याबाबत वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी दोन तरुणांसह दोन तरुणींवर देखील गुन्हा दाखल केला आहे.
वडाळ्यातील निर्मल नगर परिसरात ही पीडित मुलगी आई आणि दोन भावंडांसह राहते. वडिलांचे सहा वर्षांपूर्वीच निधन झाल्याने तिची आईच या मुलांचा सांभाळ करते. त्यामुळे ती दिवसभर घराबाहेर असते. ही संधी साधत या परिसरात राहणारे दोन तरुण या तरुणीला अनेक दिवसांपासून त्रास देत होते. यात या दोन आरोपींच्या पे्रयसींचा देखील समावेश आहे. रविवारी रात्री ही तरुणी या परिसरातील एका दुकानात गेली होती. तिथून परतत असताना या आरोपींनी तिला रस्त्यात अडवून तिच्यावर शेरेबाजी केली. त्यानंतर तरुणीने घरी येऊन फिनेल प्राशन केले काही वेळानंतर तिची आई घरी परतली, तेव्हा ही बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्यामुळे तिने तत्काळ काही शेजाऱ्यांच्या मदतीने तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी तिच्यावर तत्काळ उपचार केल्याने तिचा जीव वाचला आहे. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Tried to commit suicide in tears