थोडक्यात तीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:06 IST2021-09-24T04:06:41+5:302021-09-24T04:06:41+5:30

मुंबई : मराठी विज्ञान परिषदेने ऑक्टोबर महिन्यात कर्करोगविषयक ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. व्याख्यान करणाऱ्यांमध्ये डॉ. सुरेश आडवाणी, डॉ. ...

Three in a nutshell | थोडक्यात तीन

थोडक्यात तीन

मुंबई : मराठी विज्ञान परिषदेने ऑक्टोबर महिन्यात कर्करोगविषयक ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. व्याख्यान करणाऱ्यांमध्ये डॉ. सुरेश आडवाणी, डॉ. रजनी भिसे, डॉ. हेमंत टोणगावकर, डॉ. मनोज माहिमकर, डॉ. विजय पाटील या कर्करोगतज्ज्ञांचा समावेश आहे. प्रत्येक रविवारी सायंकाळी ५ ते ६ दरम्यान होणारी ही व्याख्याने सर्वांसाठी विनामूल्य आहेत.

-------------------

धारावीत दोन रुग्ण

मुंबई : धारावीत गुरुवारी कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत, तर दादर येथे पाच आणि माहीम येथे कोरोनाचे सहा रुग्ण आढळले आहेत. या विभागात एकूण तेरा रुग्ण आढळले आहेत.

-------------------

पडझड सुरूच

मुंबई : पावसाने विश्रांती घेतली असतानाच गुरुवारी मुंबईत दोन ठिकाणी बांधकामांचा भाग कोसळला. सहा ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. तीन ठिकाणी झाडे कोसळली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.

Web Title: Three in a nutshell