मस्तच!...सिंधुदुर्गात अन् ताडोबाजवळ 'ताज'ची हॉटेल्स; राज्यात १२५ कोटींची गुंतवणूक येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 05:37 PM2020-08-27T17:37:46+5:302020-08-27T17:49:13+5:30

महाराष्ट्र सरकारच्या "मिशन बिगिन अगेन" ला चालना देणारी बातमी गुरुवारी समोर आली

Taj Hotels investing 125 crore in Maharashtra, opening hotels in Sindhudurg and Tadoba - Aaditya Thackeray | मस्तच!...सिंधुदुर्गात अन् ताडोबाजवळ 'ताज'ची हॉटेल्स; राज्यात १२५ कोटींची गुंतवणूक येणार

मस्तच!...सिंधुदुर्गात अन् ताडोबाजवळ 'ताज'ची हॉटेल्स; राज्यात १२५ कोटींची गुंतवणूक येणार

Next

कोरोना व्हायरसमुळे व्यवसाय व उद्योग बंद असल्यामुळे महाराष्ट्र राज्यावरील आर्थिक भार अधिक वाढला आहे. अशात महाराष्ट्र सरकारच्या "मिशन बिगिन अगेन" ला चालना देणारी बातमी गुरुवारी समोर आली आहे. ताज ग्रुप आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात गुरुवारी 125 कोटींच्या गुंतवणूकीचा सामंजस्य करार झाल्याची माहिती पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून दिली. 

त्यांनी सांगितले की,''ताज हॉटेल्स ग्रुप आता अधिकृतपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आला आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला सिंधुदुर्ग जिल्हा गेल्या २ दशकांपासून या क्षणाची वाट पाहत होता. महाविकास आघाडी सरकारने पहिल्या ३ महिन्यांतच समस्यांचे निराकरण केले आणि आज या संदर्भात सामंजस्य करार झाला.''


''३ वर्षांच्या कालावधीत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेळागर-शिरोडा येथे ताज हॉटेल सुरू होणार आहे. ताज ग्रुपने ताडोबा व्याघ्र प्रकल्पाजवळ हॉटेल स्थापित करण्यासाठी सुद्धा सामंजस्य करार केला. ही दोन्ही हॉटेल्स महाराष्ट्रात १२५ कोटींहून अधिक गुंतवणूक आणतील,''असेही त्यांनी सांगितले. 

ते पुढे म्हणाले की,''संपूर्ण पर्यटन विभागासाठी हा एक अत्यंत अभिमानाचा क्षण होता. अनेक हॉटेल ग्रुप महाराष्ट्रात गुंतवणूक करत असल्याने महाराष्ट्र राज्यातील आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळत आहे. यामुळे राज्यातील "मिशन बिगिन अगेन" ला सुद्धा चालना मिळणार आहे.''

 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

आशियात अव्वल नंबर; कॅप्टन कोहलीला मिळाली आणखी एक 'गोड' बातमी! 

विराट-अनुष्काच्या गोड बातमीवर बीसीसीआय, आयसीसीच्या हटके शुभेच्छा

विराट-अनुष्का बनणार आई-बाबा; इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचं ट्विट होतंय व्हायरल, पण का?

'विरुष्का'नं दिली गोड बातमी अन् इथे नेटिझन्सनी लगावला मीम्सचा मास्टर स्ट्रोक!  

IPL 2020 Schedule Update : दोन लेगमध्ये होणार आयपीएलचे सामने; जाणून घ्या कसं असेल वेळापत्रक!

Web Title: Taj Hotels investing 125 crore in Maharashtra, opening hotels in Sindhudurg and Tadoba - Aaditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.