कायदेशीर तरतुदीनुसारच सहायक आयुक्त नितीन शुक्लांचे निलंबन; BMC आयुक्त भिडेंनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 07:40 IST2026-04-29T07:40:05+5:302026-04-29T07:40:31+5:30

नितीन शुक्ला यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी मुंबई कॉँग्रेस अध्यक्षा, खा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

Suspension of Assistant Commissioner Nitin Shukla as per legal provisions; BMC Commissioner Bhide clarifies | कायदेशीर तरतुदीनुसारच सहायक आयुक्त नितीन शुक्लांचे निलंबन; BMC आयुक्त भिडेंनी केले स्पष्ट

कायदेशीर तरतुदीनुसारच सहायक आयुक्त नितीन शुक्लांचे निलंबन; BMC आयुक्त भिडेंनी केले स्पष्ट

मुंबई - महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक झालेले मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांच्यावर कायदेशीर तरतुदींनुसार निलंबनाची कारवाई केली जाईल, असे आयुक्त अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले. महापालिका कर्मचाऱ्याला ४८ तासांहून अधिक काळ पोलिस कोठडीत ठेवण्यात आले तर त्याला सेवेतून निलंबित केले जाते अशी पालिका नियमांमध्ये तरतूद आहे. त्यानुसार शुक्लांवर कारवाई करण्यात येणार आहे. 

शुक्ला वादग्रस्त अधिकारी
शुक्ला हे याआधीही वादग्रस्त राहिले आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी माटुंगा भागात फुलवाल्यांच्या जुन्या स्टॉल्सवर केलेल्या कारवाईमुळे संतप्त झालेल्या भाजप आमदार तमिळ सेल्वन यांनी शुक्लांवर कारवाईची मागणी विधिमंडळ अधिवेशनात केली होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाने त्यांची त्या प्रभागातून बदली करून बी वॉर्डात नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान, नितीन शुक्ला यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी मुंबई कॉँग्रेस अध्यक्षा, खा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे. उच्चशिक्षित क्लास-१ अधिकाऱ्याची ही वागणूक संतापजनक असून अधिकाराचा दुरुपयोग असल्याची टीका त्यांनी केली.

Web Title : कानूनी प्रावधानों के अनुसार सहायक आयुक्त नितिन शुक्ला निलंबित: बीएमसी आयुक्त

Web Summary : बीएमसी के सहायक आयुक्त नितिन शुक्ला को कथित हमले के आरोप में गिरफ्तारी के बाद निलंबित किया जाएगा। आयुक्त भिड़े ने स्पष्ट किया कि यह कार्रवाई 48 घंटे से अधिक समय तक हिरासत में रहने वाले कर्मचारियों के नियमों के अनुसार है। शुक्ला के पहले के विवादों का भी उल्लेख किया गया है। उन्हें बर्खास्त करने की मांग उठी है।

Web Title : BMC assistant commissioner Nitin Shukla suspended as per legal provisions.

Web Summary : BMC's assistant commissioner Nitin Shukla will be suspended following his arrest for alleged assault. Commissioner Bhide clarified this action aligns with rules regarding employees detained over 48 hours. Shukla's past controversies, including actions against florists, are also noted. Calls for his dismissal have surfaced.