कोर्टात आत्महत्येचा प्रयत्न

By Admin | Updated: June 16, 2015 03:30 IST2015-06-16T03:30:25+5:302015-06-16T03:30:25+5:30

वांद्रे कोर्टात सोमवारी सायंकाळी एका ३० वर्षीय तरुणाने मानेवरून ब्लेड फिरवून स्वत:ला जखमी केले. या घटनेमुळे कोर्टात खळबळ उडाली.

Suicide attempt at court | कोर्टात आत्महत्येचा प्रयत्न

कोर्टात आत्महत्येचा प्रयत्न


मुंबई : वांद्रे कोर्टात सोमवारी सायंकाळी एका ३० वर्षीय तरुणाने मानेवरून ब्लेड फिरवून स्वत:ला जखमी केले. या घटनेमुळे कोर्टात खळबळ उडाली. या तरुणाला उपचारासाठी भाभा रुग्णालयात नेण्यात आले. निर्मलनगर पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
खार पोलिसांनी वांद्रे कोर्टात सोमवारी रिमांडसाठी विविध गुन्ह्यांतील एकूण २४ आरोपींना आणले होते. त्या वेळी आरोपींचे काही नातेवाइकही कोर्टात हजर होते. संबंधित तरुणाच्या लहान भावालादेखील दंगल आणि दरोडा प्रकरणी १० जून रोजी खार पोलिसांनी अटक केली होती. त्यालाही कोर्टात आणण्यात आले होते. सुनावणीवेळी त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानंतर त्याच्या भावाने सोबत आणलेले ब्लेड बाहेर काढून मानेवरून फिरवले. त्याला रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

Web Title: Suicide attempt at court