अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 05:33 IST2024-05-18T05:32:58+5:302024-05-18T05:33:09+5:30
काँग्रेस, उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्कवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत केले.

अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बलिदानाचा अपमान करणारी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्कवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत केले.
फडणवीस म्हणाले, मुंबईवर कसाबने हल्ला केला आणि काँग्रेसवाले हेमंत करकरे कसाबच्या गोळीने शहीद झाले नाहीत असे म्हणत आहेत. उज्ज्वल निकम यांनी काँग्रेसचा अपमान केला, असे काँग्रेसवाले म्हणत आहेत. शहिदांचा ते अपमान करत आहेत. महाविकास आघाडी कसाबसोबत आहे, आम्ही निकम यांच्यासोबत आहोत. उद्धव ठाकरेंच्या प्रचारात पाकिस्तानचे झेंडे फडकत आहेत. व्होट जिहादची भाषा केली जात आहे.
उद्धव ठाकरेंवर शरसंधान
फडणवीस म्हणाले, कोरोना काळात मोदींनी कोरोनाची लस देशात तयार केली आणि सर्वांना लस दिली. त्याचवेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात इकडे काय सुरू होते? खिचडी घोटाळा होत होता, रेमडिसिवीरचा घोटाळा सुरू होता, प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणे सुरू होते, कफनचोरी सुरू होती. या सगळ्यांचा जाब आपल्याला विचारावाच लागेल.