शिवसेनेनेच रोखली मोदी लाट - देसाई

By Admin | Updated: May 26, 2015 02:00 IST2015-05-26T02:00:45+5:302015-05-26T02:00:45+5:30

लोकसभा निवडणुकीनंतर देशभर मोदी लाट असताना विधानसभा निवडणुकीत ही लाट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच रोखली, असे सांगत ते शक्ती असतील तर आम्ही प्रतिशक्ती आहोत,

Shiv SenaNech Rokhalee Modi wave - Desai | शिवसेनेनेच रोखली मोदी लाट - देसाई

शिवसेनेनेच रोखली मोदी लाट - देसाई

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर देशभर मोदी लाट असताना विधानसभा निवडणुकीत ही लाट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच रोखली, असे सांगत ते शक्ती असतील तर आम्ही प्रतिशक्ती आहोत, असे आव्हान शिवसेनेचे सचिव खा. अनिल देसाई यांनी दिले.
वेगळे लढल्याने भाजपाला आपली शक्ती कळली असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले असताना शिवसेनेकडून मिळालेले हे प्रत्युतर दोन्ही पक्षातील दरी रुंदावणारे आहे. पत्रपरिषदेत बोलताना खा. देसाई म्हणाले,
भाजपाला वेगळे लढल्याने आपली शक्ती कळली, हे मुख्यमंत्र्यांचे कोल्हापुरातील विधान त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी होते. मात्र, मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका शिवसेनेशी युती करून लढण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया देसाई यांनी व्यक्त केली. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Shiv SenaNech Rokhalee Modi wave - Desai