Lakhimpur Kheri Violence: “देशात अघोषित आणीबाणी, हे रामराज्य आहे का?”; संजय राऊतांचा मोदी सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 11:56 AM2021-10-05T11:56:22+5:302021-10-05T11:58:37+5:30

ज्या पद्धतीने पोलिस प्रियांका गांधी यांच्याशी वागले ते आदेशच होते, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

shiv sena sanjay raut criticised bjp and modi govt over lakhimpur kheri violence | Lakhimpur Kheri Violence: “देशात अघोषित आणीबाणी, हे रामराज्य आहे का?”; संजय राऊतांचा मोदी सरकारला सवाल

Lakhimpur Kheri Violence: “देशात अघोषित आणीबाणी, हे रामराज्य आहे का?”; संजय राऊतांचा मोदी सरकारला सवाल

Next
ठळक मुद्देप्रियंका गांधी यांना कोणत्याही वॉरंटशिवाय तिथे ताब्यात घेतलेपोलीस प्रियांका गांधी यांच्याशी वागले ते आदेशच होतेमोदी सरकारने शेतकऱ्यांची माफी मागावी

मुंबई: लखीमपूर खिरी येथील घटनेबद्दल जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. शेतकरी नेते आणि विरोधक केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकार यांच्याविरोधात जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहेत. लखीमपूर येथे भेट द्यायला गेलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनाही ताब्यात घेण्यात आल्याबाबत काँग्रेसकडून निषेध केला जात आहे. यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली असून, देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे. हेच का तुमचे रामराज्य, असा रोखठोक सवाल यावेळी करण्यात आला आहे. (shiv sena sanjay raut criticised bjp and modi govt over lakhimpur kheri violence)

प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, प्रियांका गांधी यांच्याशी तुमचे राजकीय वैर असू शकते, काँग्रेसशी असू शकते, पण त्यांचा गुन्हा काय आहे की कोणत्याही वॉरंटशिवाय तिथे ताब्यात घेतले? त्या इंदिरा गांधी यांची नात आहे, त्या महिला आहेत. ज्या पद्धतीने पोलिस प्रियांका गांधी यांच्याशी वागले ते आदेशच होते, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. 

शेतकऱ्यांची माफी मागावी

लखीमपूर खेरी येथील झालेल्या हिंसाचारावर बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, मोदी सरकारने शेतकऱ्यांची माफी मागावी. हे काही रामराज्य आहे का? तुम्ही माफी मागत आहात का? शेतकऱ्यांना चिरडण्याचा विषय आहे. यावर माफी मागितलीच पाहिजे. देशात अघोषित आणिबाणी सुरू आहे. पण शेतकरी, जनता लढत राहतील, या शब्दांत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. 

सामना अग्रलेखातूनही टीकास्त्र

महाराष्ट्रातील भाजप नेते मराठवाडा, विदर्भातील संकटग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांधावर पोहोचले तेव्हा त्यांना कोणी रोखले नाही, पण उत्तर प्रदेशात शेतकरी चिरडून मारले गेले. शेतकऱ्यांना मारायचे व राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी करायची ही कसली लोकशाही? केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने केलेला हा अपराध दुसऱ्या एखाद्या राज्यात घडला असता तर भाजपने देश डोक्यावर घेतला असता, असे म्हणत शिवसेनेने उत्तर प्रदेशातील घटनेवर संताप व्यक्त केला. 

दरम्यान, आता शेतकऱ्यांनाच गुन्हेगार, अराजकवादी ठरविण्यासाठी आटापिटा सुरू आहे. शेतकऱ्यांच्या हत्या, शेतकऱ्यांचे रक्त यापेक्षा श्रीमंतांच्या पोरांची अमली पदार्थांची व्यसने आणि थेरं कुणाला महत्त्वाची वाटत असतील तर ‘जय जवान, जय किसान’चे नारे कशासाठी द्यायचे? बंद करा ती थेरं!, असे शिवसेनेनं म्हटले आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून या प्रकरणावर संताप व्यक्त केला.
 

Web Title: shiv sena sanjay raut criticised bjp and modi govt over lakhimpur kheri violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.