Shiv Sena leader Sanjay Raut has criticized BJP's politics | आम्हीच तुम्हाला सरकार पाडण्याचा मुहूर्त देऊ, पण...; संजय राऊतांनी सांगितले कारण

आम्हीच तुम्हाला सरकार पाडण्याचा मुहूर्त देऊ, पण...; संजय राऊतांनी सांगितले कारण

मुंबई: मध्यप्रदेशापाठोपाठ राजस्थानमध्येही भाजपाने सरकार पाडण्यास सुरुवात केली असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना संकटकाळात ४ महिन्यापूर्वी मध्यप्रदेशात जे घडलं तेच राजस्थानमध्ये होताना दिसत आहे. या सर्व घडामोडी पाहता महाराष्ट्रातही ऑक्टोबरमध्ये सरकार पाडण्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातलं सरकार पाडून दाखवाचं, असं आव्हान शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, कोणताही मुहुर्त काढा, आमचं सरकार पाच वर्ष चालणार. काहींना जुगार खेळण्याचा छंद असतो, जुगार खेळत राहतात, हे मध्यप्रदेश नाही, महाराष्ट्र आहे, असं संजय राऊत यांनी सांगितले. (Maharashtra Goverment) तुमचं हे ऑपरेशन कमळ, लोट्स महाराष्ट्रात चालणार नाही. तुमचं ऑपरेशन लोट्स असेल तर आम्ही ऑपरेशन लोटांगण सुरू करून तुम्हाला धडा शिकवू, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

"एका मुलाखतीनंतर खळबळ उडणार होती ना; कुठे काही उडलेलं तर दिसलं नाही"

संजय राऊत पुढे म्हणाले की, रोज रोज सरकार पडणार सरकार पडणार काय सांगता? सरकार पाडायचं ना? मग पाडाच. हे माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे. तुमच्या राजकीय जीवनाचं ते जर उद्दिष्टंच असेल तर त्याला कोण काय करणार, असा टोला देखील संजय राऊतांनी लगावला आहे. 

आम्ही राज्य वाचवण्याचं काम करत आहोत. तुम्ही राज्य बिघडवू नका. देशावर मोठं संकट आलं आहे. शंभर वर्षात आलं नव्हतं एवढं मोठं कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे देश आणि राज्याला या संकटातून वाचवण्यासाठी पुढे या, असं आवाहन देखील संजय राऊतांनी केलं आहे. तसेच कोरोनाच्या संकटातून एकदा आपण बाहेर पडलो, तर आम्हील तुम्हाला सरकार पाडण्याचा मुहूर्त देऊ, मग सरकार पाडण्याचा खेळ खुशाल खेळत बसा. पण आता ही वेळ नक्कीच नाही, असं संजय राऊत यांनी सांगितले. 

केतकी चितळेची मनसेकडून कानउघाडणी; महापुरुषांबद्दल बोलताना ताळतंत्र पाळा, नाहीतर...

दरम्यान,  राजस्थानमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. (Rajasthan Politics) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर सचिन पायलट दिल्ली मुक्कामी आहेत. काँग्रेसचे २४ आमदार दिल्लीनजीक विरोधी पक्षाचं सरकार असणाऱ्या एका राज्यात हॉटेलमध्ये राहणे आणि पक्षाच्या नेतृत्वाशी संपर्कात नसणे यावरुन मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजपावर आमदारांच्या घोडेबाजाराचा आरोप केला आहे.सर्वकाही अशाप्रकारे होत आहे जसं ४ महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशात घडलं होतं. त्यानंतर मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार कोसळलं होतं. त्यामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली आहे. कमलनाथ यांच्याप्रमाणे त्यांच्या सरकारवरही टांगती तलावर लटकली आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shiv Sena leader Sanjay Raut has criticized BJP's politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.