केतकी चितळेची मनसेकडून कानउघडणी; महापुरुषांबद्दल बोलताना ताळतंत्र पाळा, नाहीतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 02:06 PM2020-07-12T14:06:00+5:302020-07-12T15:01:06+5:30

मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे केतकी चितळेवर निशाणा साधला आहे.

Actress Ketaki Chitale has been criticized by MNS leader Rupali Patil | केतकी चितळेची मनसेकडून कानउघडणी; महापुरुषांबद्दल बोलताना ताळतंत्र पाळा, नाहीतर...

केतकी चितळेची मनसेकडून कानउघडणी; महापुरुषांबद्दल बोलताना ताळतंत्र पाळा, नाहीतर...

Next

मुंबई: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल  स्टँड-अप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने केलेल्या विनोदामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी अग्रिमा जोशुआ काम करत असलेल्या स्टुडिओची तोडफोड केली होती. मात्र याचदरम्यान, मराठी अभिनेत्री केतकी चितळेने एक फेसबुक पोस्ट केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

3 वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा,' असं केतकीने आपल्या फेसबुक पोस्टद्वारे म्हटलं आहे. केतकी चितळेच्या या पोस्टनंतर तिला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले होते. त्यातच आता मनसेने देखील केतकीची कानउघडणी केली आहे.

मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे केतकी चितळेवर निशाणा साधला आहे. रुपाली पाटील म्हणाल्या की, केतकी यावेळी तू चुकलीस. मागे तुला ट्रोल केले म्हणून आम्ही महिलेला असे ट्रोल करू नये, असं नेटकऱ्यांना सुनावले होते. नावडती केतकी दरवेळेला वादग्रस्त विधान करून लोकांना त्रास देण्याचा काम करते आहे. 

माझं तुला मनसे सांगणे आहे की,  छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आणि करोडो मावळ्यांचे मनावर ते राज्य करत आहे. त्यामुळे कितीही शिकलेले असू द्या, आपली सद्सद्द्विवेक बुद्धी जागी ठेवली नाही तर त्या उच्च शिकण्याचा काहीच उपयोग नाही, असं रुपाली पाटील यांनी सांगितले आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा अन्य कोणत्याही महापुरुषांच्याबाबतीत लोक संवेदशील असतात. त्यामुळे अशा दैवता बद्दल, महापुरुषांबद्दल बोलताना ताळतंत्र पाळलेच पाहिजे, अन्यथा कितीही उच्च शिक्षित मावळे असले तरी ते महाराजांबद्दल बोलणाऱ्या व्यक्तीला त्याची लायकी दाखवल्याशिवाय शंभर फटके हाणून एक मोजल्या शिवाय राहत नाही. याची दखल उच्च शिक्षण शिकूनही बुद्धी नसलेल्या लोकांनी घ्यावी, असा इशारा रुपाली पाटील यांनी दिला आहे.


यावेळी तू चुकलीस ,मागे तुला ट्रोल केले म्हणून आम्ही महिलेला असे ट्रोल करू नये म्हणून नेटकर्यांना सुनावले होते

नावडती...

Posted by Rupali Patil Thombare on Saturday, 11 July 2020

"शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग 3 वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा!

सोशल मीडियावर 'मराठी' असा शब्द टाकून वाटेल तसा वणवा, काही लाईक्ससाठी पेटवणारे 20 ते 25 वयोगटातील पोरे, ज्यांना खऱ्या आयुष्यात कुणी भाव अथवा नोकरी ही देणार नाही अशी कार्टी, या सर्कसचे रिंग मास्टर असतात. अरे मूर्खांनो, शालेय शिक्षण तरी घ्या! पण ते तरी कसे घेणार, कारण आमचे प्रेरणास्थान तर आर्ची (नाव ही मराठी नाही) आणि पर्शा! आम्ही फक्त भांडण करण्यासाठी महाराज, बाबासाहेब, फुले यांची नावे घेणार, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास कोण करणार!! सुधारणा करा बाळांनो, शिका," अशी आक्रमक पोस्ट केतकी चितळेने लिहिली आहे.

Web Title: Actress Ketaki Chitale has been criticized by MNS leader Rupali Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.