विरोधी पक्षनेतेपदासाठी शिंदेंचा अजर्

By Admin | Updated: November 10, 2014 22:29 IST2014-11-10T22:29:16+5:302014-11-10T22:29:16+5:30

विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकीकडे आज जाहीर केला

Shinde's petition for Leader of Opposition | विरोधी पक्षनेतेपदासाठी शिंदेंचा अजर्

विरोधी पक्षनेतेपदासाठी शिंदेंचा अजर्

ठाणो : विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकीकडे आज जाहीर केला तर दुसरीकडे विधिमंडळ शिवसेना गटनेतेपदी निवड झालेल्या एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणारा अर्ज सादर केला. त्यामुळे या पदावर त्यांची निवड निश्चित मानली जात असली तरी राजकारणात ऐनवेळी काहीही घडू शकत असल्यामुळे ते मंत्री होतील की विरोधी पक्षनेते होतील, याबाबतचा संभ्रम कायम राहिला आहे. 
शिंदे यांचा अर्ज शिवसेनेच्या दबावतंत्रचा एक भाग मानला जात असल्याची चर्चा राजकीय वतरुळात आहे. विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय ऐनवेळी शिवसेना बदलेल आणि आपल्या मागण्या भाजपाने मान्य केल्या की, सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेईल आणि आपल्या कोटय़ातल्या मंत्रीपदांसाठी जी यादी सादर करेल, त्यात एकनाथ शिंदे यांचे नाव पहिले असेल, असेही मानले जात आहे. परंतु, असे घडले नाही तरी शिंदे यांना मंत्रीपदाचा नाहीतर विरोधी पक्षनेतेपदाचा लाल दिवा मिळणारच, हे आता निश्चित झाले आहे. 
शिंदे यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. एकाच वेळी जिल्हाप्रमुख आणि जिल्हासंपर्क प्रमुख ही दोन पदे समर्थपणो सांभाळणो, पुत्र खासदार आणि वडील आमदार अशी दुहेरी सत्तापदे ती ही जनतेच्या मतदानाद्वारे प्राप्त करणो, आनंद दिघे स्वर्गवासी झाल्यानंतर त्यांनी निर्माण केलेला बालेकिल्ला प्रभावीरीत्या सांभाळणो, संपूर्ण ठाणो जिल्हय़ात शिवसेनेची मजबूत बांधणी करणो, ठाणो आणि पालघर जिल्ह्यांतील चारही विद्यमान खासदारांचा पराभव घडवून तेथे महायुतीचे चारही नवे चेहरे असलेले खासदार निवडून आणणो, ठाणो जिल्हा शिवसेनेत बेरजेचे राजकारण करून अनेक पक्षांतील समर्थ नेत्यांना शिवसेनेत आणणो व त्यांचे नेतृत्व स्थापित करणो, यामुळेच त्यांचे शिवसेनेतील स्थान नेहमी मजबूत होत गेले आहे. 
(विशेष प्रतिनिधी)

 

Web Title: Shinde's petition for Leader of Opposition