नीलम राऊत माहीमच्या सरपंच

By Admin | Updated: March 11, 2015 22:26 IST2015-03-11T22:26:48+5:302015-03-11T22:26:48+5:30

माहिम ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी परिवर्तन समितीच्या सदस्या निलम राऊत यांची बिनविरोध निवड झाली आहे. माहिम ग्रामपंचायतीवर

Sapchanch of Neelam Raut Mahim | नीलम राऊत माहीमच्या सरपंच

नीलम राऊत माहीमच्या सरपंच

पालघर : माहिम ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी परिवर्तन समितीच्या सदस्या निलम राऊत यांची बिनविरोध निवड झाली आहे.
माहिम ग्रामपंचायतीवर अनेक वर्षापासून सेनेचे वर्चस्व होते. परंतु सेनेच्या काही लोकांची गैरव्यवहाराची प्रकरणे समोर आल्यानंतर सेना विरोधात सर्व पक्षीय परिवर्तन समितीने निवडणूक दिड वर्षापूर्वी जिंकली होती. समितीच्या अपेक्षा मेहेर या सरपंचपदी विराजमान झाल्या होत्या. परंतु ठरल्याप्रमाणे त्यांनी वर्षभरानंतर सरपंचपदाचा राजीनामा दिला. काँग्रेसमधून वैशाली चौधरी तर सेनेमधून वैभवी मोरे यांनी अर्ज दाखल केले. मात्र मुदतीत दोघांनी आपले अर्ज मागे घेतल्याने परिवर्तनाच्या सदस्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्ष निलम राऊत यांची एकमताने निवड केल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषीत केले. जल प्रदूषण, राखीव भूखंडावरील अतिक्रमणे, व माहिम-वडराईच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार असल्याचे त्या म्हणाल्या. (वार्ताहर)

Web Title: Sapchanch of Neelam Raut Mahim