ठाण्यात शिवसेनेचे संजय मोरे महापौर तर राजेंद्र साप्ते उपमहापौर

By Admin | Updated: September 6, 2014 02:41 IST2014-09-06T02:41:13+5:302014-09-06T02:41:13+5:30

ठाणो महापौर पदासाठी शिवसेनेने ज्येष्ठ नगरसेवक संजय मोरे यांना तर उपमहापौरपदासाठी राजेंद्र साप्ते यांना संधी दिली आहे.

Sanjay More Mayor of Shiv Sena in Thane and Rajendra Sapte Deputy Mayor | ठाण्यात शिवसेनेचे संजय मोरे महापौर तर राजेंद्र साप्ते उपमहापौर

ठाण्यात शिवसेनेचे संजय मोरे महापौर तर राजेंद्र साप्ते उपमहापौर

घोडबंदर : ठाणो महापौर पदासाठी शिवसेनेने ज्येष्ठ नगरसेवक संजय मोरे यांना तर उपमहापौरपदासाठी राजेंद्र साप्ते यांना संधी दिली आहे. लोकशाही आघाडीतर्फे काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी महापौरपदासाठी आणि मेघना हंडोरे यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दखल केले आहेत. 1क् सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे. काँग्रेसचे रवींद्र फाटक व जयश्री फाटक यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्यामुळे व राष्ट्रवादीचे नगरसेवक रऊफ लाला यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने आघाडीकडे बहुमत प्राप्त नाही. बहुमताचा 65 चा आकडा महायुतीकडे असल्यामुळे युतीचा विजय निश्चित आहे. (वार्ताहर)

 

Web Title: Sanjay More Mayor of Shiv Sena in Thane and Rajendra Sapte Deputy Mayor