दारु पिऊन कार चालवणे भोवले

By Admin | Updated: June 17, 2015 02:55 IST2015-06-17T02:55:57+5:302015-06-17T02:55:57+5:30

दारु पिऊन गाडी चालविणाऱ्या एका महिलेला सोमवारी मध्यरात्री नाकाबंदी दरम्यान वांद्रे वाहतूक पोलिसांनी अटक केली

Running an ammunition and driving a car | दारु पिऊन कार चालवणे भोवले

दारु पिऊन कार चालवणे भोवले

महिलेवर कारवाई : वांद्रे पोलिसांची कारवाई


मुंबई : दारु पिऊन गाडी चालविणाऱ्या एका महिलेला सोमवारी मध्यरात्री नाकाबंदी
दरम्यान वांद्रे वाहतूक पोलिसांनी अटक केली. या महिलेने दारू प्यायल्याचे वैद्यकीय चाचणीत सिद्ध झाले आहे.
शिवानी सुरजीत बाली (४२) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. सोमवारी रात्री वांद्रे येथील लिलावती रुग्णालयाच्या परिसरात पोलिसांची नाकाबंदी सुरु होती. त्यावेळी एमएसआरडीसीसमोर रेक्लेमेशन परिसरात वाहतूक पोलिसांनी या महिलेची कार अडवली.
तिला अडवून ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’च्या मदतीने तिची तपासणी केली. तेव्हा तिने दारू प्यायल्याचे उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन नंतर वाहतूक पोलिसांच्या स्वाधीन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Running an ammunition and driving a car