कंपनीच्या मालकाला ५४ लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:06 IST2021-03-05T04:06:35+5:302021-03-05T04:06:35+5:30

मुंबई : विश्वास संपादन करून ठगांनी एका कंपनीच्या मालकाची तब्बल ५४ लाख रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

Rs 54 lakh bribe to company owner | कंपनीच्या मालकाला ५४ लाखांना गंडा

कंपनीच्या मालकाला ५४ लाखांना गंडा

मुंबई : विश्वास संपादन करून ठगांनी एका कंपनीच्या मालकाची तब्बल ५४ लाख रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कंपनी मालकाने बुधवारी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पाेलीस अधिक तपास करत आहेत.

...................................

मैत्रीचा गैरफायदा घेऊन फसवणूक

मुंबई : मैत्री आणि कौटुंबिक ओळखीचा गैरफायदा घेऊन नागपाड्यातील एका कुटुबांच्या नावावर असलेल्या दोन फ्लॅटवर बँकेकडून क्रेडिट फॅसिलिटी घेऊन कर्ज न फेडता या कुटुंबाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी बुधवारी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.

............................

पाेलिसांची ड्रग्जविरोधात विशेष मोहीम

मुंबई : मुंबई पोलिसांकडून ड्रग्जविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत तपासाअंती छोट्या-मोठ्या तस्करांची धरपकड सुरू आहे. पोलीस प्रत्येक यासंदर्भातील प्रत्येक घटना, घडामाेडींवर लक्ष ठेवून आहेत.

..........................

Web Title: Rs 54 lakh bribe to company owner