मुरुडमध्ये रानभाज्यांनी फुलला बाजार

By Admin | Updated: June 16, 2015 23:01 IST2015-06-16T23:01:45+5:302015-06-16T23:01:45+5:30

आयुर्वेदशास्त्रात रानभाज्या, कंदमुळामध्ये भरपूर पोषकतत्त्वे व औषधी गुणधर्म असल्याचे सांगितले जाते. मुरुडनजीक डोंगरमाथ्यावरील टक्याचीवाडी

Rarbhajjas full flower market in Murud | मुरुडमध्ये रानभाज्यांनी फुलला बाजार

मुरुडमध्ये रानभाज्यांनी फुलला बाजार

मुरुड : आयुर्वेदशास्त्रात रानभाज्या, कंदमुळामध्ये भरपूर पोषकतत्त्वे व औषधी गुणधर्म असल्याचे सांगितले जाते. मुरुडनजीक डोंगरमाथ्यावरील टक्याचीवाडी, तेलवडे व नवीवाडी येथील आदिवासी महिला उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पावसाळी रानभाज्यांची विक्री रस्त्यावर, फिरून वा भाजी मार्केट परिसरात करतात. ज्यामध्ये टाकळा, कोळा, कुड्याच्या शेंगा, भारंग, कंटोळी आदी झाडपाल्यांचा समावेश असतो.
पावसाळ्यात गढूळ पाण्यामुळे बऱ्याचदा अतिसार, मलेरिया आदी साथीच्या रोगांची लागण होत असते. तथापि रानटी भाज्यांची बरोबर मात्रा लागू पडते. कुडाच्या शेंगांची भाजी तशी कडवट परंतु मूत्रविकार वा उष्णतेच्या विकारावर रामबाण इलाज करते. भारंग ही वनस्पती दमा, खोकला व पोटाच्या विकारासाठी खूप जास्त उपयुक्त.
रस्त्याच्या कडेला उगवणारा टाकळा रक्तशुद्धीकरणासाठी गुणकारी ठरतो. पावसामुळे मार्केटमध्ये आवक कमी झाल्याने भाजीपाला महागलेला असतो. मात्र १० ते १५ रुपयात रानभाजी मिळते. अलीकडे वालाच्या शेतात पावसाळी कोंब आलेला बिरडा मोठ्या प्रमाणावर खरेदी केला जातो. तो पण अल्प किमतीत. चार पैसे दिमतीला असावेत म्हणून आदिवासी महिला डोंगरदऱ्यातून रानभाजी विकताना दिसतात. (वार्ताहर)

Web Title: Rarbhajjas full flower market in Murud