एपीआयकडून महिला पीएसआयवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:05 IST2021-04-18T04:05:17+5:302021-04-18T04:05:17+5:30

कफ परेडच्या सहायक निरीक्षकावर गुन्हा दाखल; लग्नाच्या आमिषाने आठ वर्षांपासून शरीरसंबध लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आपल्याच खात्यातील ...

Rape of female PSI by API | एपीआयकडून महिला पीएसआयवर बलात्कार

एपीआयकडून महिला पीएसआयवर बलात्कार

कफ परेडच्या सहायक निरीक्षकावर गुन्हा दाखल; लग्नाच्या आमिषाने आठ वर्षांपासून शरीरसंबध

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आपल्याच खात्यातील महिला सहकारी अधिकाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून सहायक पोलीस निरीक्षकाने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संदीप शिवाजी पिसे असे त्याचे नाव असून महिला पाेलीस उपनिरीक्षकाने दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्यावर डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिसे कफ परेड पोलीस ठाण्यात एपीआय म्हणून कार्यरत असून गेल्या ८ वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवल्यानंतर गेल्या महिन्यात त्याने अन्य तरुणीशी विवाह केल्याने तिने ही तक्रार दाखल केली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोघे १०८ क्रमांकाच्या पीएसआय तुकडीचे अधिकारी आहेत. २०१३ मध्ये दोघे डोंगरी पोलीस ठाण्यात नियुक्तीला होते. त्यावेळी पिसे व तिचे प्रेमसंबंध जुळून शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. गेल्या वर्षी त्याची पदोन्नती झाली तर महिला उपनिरीक्षकाची पुण्याला बदली झाली. वारंवार लग्नाची विचारणा करूनही तो टाळाटाळ करीत असे. गेल्या महिन्यात त्याने अन्य तरुणीशी विवाह केला. त्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली. एपीआय पिसेवर बलात्कार, फसवणूक, विनयभंग, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आदी कलमान्वये नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

............................

Web Title: Rape of female PSI by API